घरमहाराष्ट्रअब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत, अजित पवारांनी बाहेर काढला १५० कोटींचा घोटाळा

अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत, अजित पवारांनी बाहेर काढला १५० कोटींचा घोटाळा

Subscribe

नागपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूर न्यास प्राधिकारणाचा भूखंड घोटाळा बाहेर आल्यानंतर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या १५० कोटींच्या घोटाळ्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भांडाफोड केला आहे. आज विधानसभेत गायरान जमिनीबाबत झालेल्या घोटाळ्याचा तपशीलच अजित पवारांनी विधानसभेत मांडला.

गायरान जमिनीच्या वाटपात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग केला. जमिनीचे वाटप करत असताना तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग करून सर्व कायदेशीर बाबींचे उल्लंघन केले. याबाबत नागपूर खंडपीठाने गंभीर निरीक्षण नोंदवले. राज्यमंत्र्यांविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावेही उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असतानाही महसूल राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, असा आरोप अजित पवारांनी केला. आरोप करताना त्यांनी आता राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत वेलमध्ये सत्तारांविरोधात घोषणाबाजी केली.

- Advertisement -

हेही वाचा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आता लोकायुक्तांच्या कक्षेत; विधानसभेत विधेयक मंजूर

महसूलमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना महसूल राज्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अवैध आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. तोपर्यंत राज्यात सत्तांतर होऊन हे शिंदे सरकार सत्तेवर आलं होतं. या पत्रातून वादग्रस्त आदेशाची अंमलबजावणी केल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अनादर होईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं होत. तसेच योग्य दिशानिर्देश देण्याची मागणी केली होती. मात्र माझ्या माहितीप्रमाणे या पत्रावर अद्यापपर्यंत शासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. ही जमीन ३७ एकर असून, त्याची दिडशे कोटी रुपये एवढी किंमत आहे. ही वाशिमला लागून आहे. या प्रकरणात महसूल राज्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. सुप्रिम कोर्टाचा निर्णय, राज्य सरकारचा निर्णय सर्व बाबी समोर असताना त्यांनी एका व्यक्तीला फायदा मिळवून दिला. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे महसूलराज्य मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सीमावादावरून विरोधकांची श्रेयवादाची लढाई – प्रवीण दरेकर

दरम्यान, याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाईही केली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना आश्वासन दिलं.

विधानसभेच्या परिसरातही विरोधकांनी या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. सत्तारांविरोधात घोषणाबाजी करत जितेंद्र आव्हाडांसह अनेक आमदारांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. एकनाथ शिंदे यांचं नागपूर भूखंड प्रकरण ताजं असतानाच हा घोटाळा बाहेर आल्याने विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा …तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित करा; उद्धव ठाकरे यांची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -