घरताज्या घडामोडीFilm and Television Institute of India च्या अध्यक्षपदी अभिनेता R. Madhavan

Film and Television Institute of India च्या अध्यक्षपदी अभिनेता R. Madhavan

Subscribe

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था पुण्यातून असून, ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे .

नवी दिल्ली : देशातील नामांकित संस्थेपैकी एक असलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या अध्यक्षपदी अभिनेता आर. माधवन यांची निवड करण्यात आली आहे. याची घोषणा अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करीत केली.(Actor R. Madhavan as President of Film and Television Institute of India)

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था पुण्यातून असून, ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे .1960 मध्ये पुण्यातील प्रभात स्टुडिओ परिसरात या संस्थेची स्थापना झाली. गेल्या काही वर्षांमध्ये, भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि दूरदर्शनच्या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे. नसीरुद्दीन शाह , शबाना आझमी, ओम पुरी, जया बच्चन यांसारख्या सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी FTII कडून प्रशिक्षण घेतले आहे. आता त्याच संस्थेचे अध्यक्ष अभिनेता आर.माधवन हे झाले आहेत.

- Advertisement -

मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली घोषणा

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करत अभिनेता आर. माधवन यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, एफटीआयआय आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर. माधवन यांचे अभिनंदन. मला खात्री आहे की, तुमचा अफाट अनुभव आणि भक्कम नीतिमत्ता या संस्थेला समृद्ध करेल, सकारात्मक बदल घडवून आणेल आणि तिला उच्च पातळीवर नेईल. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. असे त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

माधवनच्या रॉकेट्रीला मिळाला होता पुरस्कार

अलीकडेच आर माधवनच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या यशानंतर त्यांच्यावर ही सर्वात मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : JALNA MARATHA PROTESTERS LATHI CHARGE : वाहत्या गंगेत हात धुवू नका; फडणवीसांचा विरोधकांना इशारा

असा आहे आर.माधवन यांचा परिचय

रंगनाथन माधवन म्हणजेच आर. माधवन यांचा जन्म 1 जून 1970 रोजी जमशेदपूर बिहार (आता झारखंड ) येथे एका तमिळ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील रंगनाथन अय्यंगार, टाटा स्टीलमध्ये व्यवस्थापन कार्यकारी होते आणि त्यांची आई, सरोजा, बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक होत्या. त्यांची धाकटी बहीण देविका ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. झारखंडमध्ये त्यांचे संगोपन तमिळ भाषिक परिवारात झाले. माधवनचे शालेय शिक्षण DBMS इंग्लिश स्कूल जमशेदपूर येथून झाले.

हेही वाचा: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे मायबोलीवर प्रेम अन् उद्धव ठाकरे बोलले हिंदीत

आर.माधवनचा कोल्हापूरशी विशेष संबंध

अभिनेता आर. माधवनचे कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात उच्च शिक्षण झाले. साधारणतः पाच वर्षं आर. माधवन हा कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास होता. या दरम्यान त्याचे कोल्हापूरशी एक वेगळेच नातं निर्माण झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -