घरताज्या घडामोडीराज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

Subscribe

राज्यात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीला जबाबदार धरत विरोधकांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. त्यातच विरोधी पक्षातील नेत्यांना सर्रासपणे धमकावले जात आहे. महिला नेत्यांविरोधात आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली जात आहे. तरीही अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था हा आपल्या राज्यातील मोठा प्रश्न बनला आहे. मागील 6-7 महिन्यांमध्ये परिस्थिती आणखीनच बिघडत चालली आहे. खासदार संजय राऊतांना मिळालेल्या धमकीबाबत पोलिसांनी तपास करून कारवाई तर केली पाहिजे. सोबतच महिला नेत्यांना शिवीगाळ करणार्‍यांवरदेखील कारवाई करण्यात यावी. सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणार्‍यांवर अद्याप कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच, त्यांची हकालपट्टीदेखील करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला, पण तो हल्ला गद्दारांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला आहे, म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येईल, असे वाटले होते, पण त्यांचा आपापसात गँगवॉर सुरू झाला आहे का? हादेखील एक प्रश्न असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

काही राजकीय पक्ष दुसर्‍यांचे नेते, दुसर्‍यांचे नाव चोरण्यात व्यस्त आहेत, परंतु आम्ही आमचे काम करत आहोत. लोकांना ते ठावूक आहे. त्यामुळे निवडणुका होतील, तेव्हा जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. प्रामाणिक लोकांना निवडून देऊन जनता गद्दारांना घरी बसवेल, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -