घरदेश-विदेशशिवसेनेनंतर Ajit Pawar आणि Sharad Pawar गटाचा निकाल 31 जानेवारीपर्यंत येणार ?

शिवसेनेनंतर Ajit Pawar आणि Sharad Pawar गटाचा निकाल 31 जानेवारीपर्यंत येणार ?

Subscribe

अजित पवारांसह त्यांच्या 8 सहकारी (आमदार) 2 जुलै 2023 पक्षासोबत बंड करत शिंदे-फडणवीस यांची हात मिळवणी करत उपमुखमंत्री पदाची शपथ घेतली.

मुंबई : शिवसेना ही शिंदेची, असा महत्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (10 जानेवारी) दिला आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाचे आमदार पात्र झाले आहेत, असाही निकाल विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेबाबत दिला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालाची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे. कारण एकनाथ शिंदेप्रमाणे अजित पवारांनी देखील बंड केले होते. यानंतर अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर आणि शरद पवार गटाने याचिका करण्यात आल्या आहेत. तर अजित पवार गटावर अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका अजित पवार गटाकडून केली आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अजित पवार आणि शरद पवार गटचा निकाल हा 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निकाल द्याचा आहे.

अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मान्यता द्यावी आणि निवडणूक चिन्हा घड्याळ मिळण्याची देखील मागणी करणारी याचिका निवडणूक आयोगाकडे केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 8 डिसेंबरला पूर्ण झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाच्या युक्तीवादानंतर निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला होता. निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल देऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut यांनी ‘लोकशाही’ला वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली; काय आहे कारण?

अजित पवार आणि शरद पवार गटाच्या सुनावणीचे असे आहे वेळा पत्रक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक राहुल नार्वेकरांनी ठरविले असून यानुसार, 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू होणार आहे. तर 20 जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी, 20-21 जानेवारीला अजित पवार गटाची उलट तपासणी, 22-23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी, 23 जानेवारीला शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उटलतपासणी, 25-27 जानेवारीला अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाच्या अंतिम युक्तीवाद होणार आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाचा निकाल 31 जानेवारीला आला नाही, तर 10 फेब्रुवारीपर्यंत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – MLA Disqualification : ‘या’ पाच चुकांमुळे Uddhav Thackeray यांनी गमावली Shiv Sena

अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मान्यता द्यावी आणि निवडणूक चिन्हा घड्याळ मिळण्याची देखील मागणी करणारी याचिका निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच याचिका शरद पवार गटाने देखील हीच याचिका दाखल केली होती. अजित पवारांसह त्यांच्या 8 सहकारी (आमदार) 2 जुलै 2023 पक्षासोबत बंड करत शिंदे-फडणवीस यांची हात मिळवणी करत उपमुखमंत्री पदाची शपथ घेतली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -