घरमहाराष्ट्रनाशिकMLA Disqualification : विधानसभा अध्यक्षांनी अतिशय योग्य, कायदेशीर निकाल दिला; फडणवीसांची प्रतिक्रिया

MLA Disqualification : विधानसभा अध्यक्षांनी अतिशय योग्य, कायदेशीर निकाल दिला; फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

नाशिक : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी (10 जानेवारी) दिला. दोन्ही गटातील आमदार पात्र असल्याचा निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. मात्र निकाल देताना शिंदे गटाकडे शिवसेना पक्ष देण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. असे असले तरी विधानसभा अध्यक्षांनी अतिशय चांगला कायदेशीर निकाल दिला आहे, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (MLA Disqualification Assembly Speaker Rahul Narwekar gave a very fair legal verdict Devendra Fadnavis reaction)

हेही वाचा – Sanjay Raut यांनी ‘लोकशाही’ला वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली; काय आहे कारण?

- Advertisement -

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदार अपात्रतेचा जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. त्यासंदर्भात मी आनंद व्यक्त करतो. त्यामुळे आता कोणाच्याही मनात ही शंक असण्याचं कारण नाही आहे की, महाराष्ट्रात मजबूत सरकार आहे आणि सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विरोधकांकडून आरोप केला जात आहे की, हा निकाल मॅनेज आहे. विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निकाल दिला आहे, त्यांनी कायद्याचा मुडदा पाडला आहे. या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांना कायदा समजत नाही, ज्यांनी कधी कायदा पाळला नाही, असे लोक अशाप्रकारे बोलतात. त्यामुळे या लोकांचं आश्चर्य वाटत नाही. कारण हे तेच लोक आहेत, जे त्यांच्याविरोधात निकाल गेला तर सर्वोच्च न्यायलयावर आरोप करतात. त्यामुळे त्यांनी अध्यक्षांवर आरोप केल्यामुळे मला आश्चर्य वाटत नाही. कारण कसाही निकाल आला असला तरी ते आरोप करणारच आहेत, असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.

- Advertisement -

ठाकरे गटाच्या 14 आमदारांवर अपात्रता किंवा पात्र अशी कोणतीही कारवाई झाली नाही. या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली नाही, म्हणजे ते अजून ते पात्र आहेत. मी पूर्ण निकाल वाचला नाही, पण बऱ्यापैकी वाचला आहे. त्यांना अध्यक्षांनी काही तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरवले नाही. याचा अर्थ त्यांच्या पक्षाला किंवा त्यांना शिवसेना मानलं आहे असं नाही. मूळ शिवसेना पक्ष ठरवायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितला होता, त्याप्रमाणे शिवेसना पक्ष अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांचा ठरवलेला आहे. जे तीन मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते, त्याचं अतिशय कायदेशीर असं विवेचन विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे.

हेही वाचा – Shambhuraj Desai : शिंदे गटाचा ‘चोर मंडळ’ उल्लेख; ‘या’ दोन नेत्यांविरोधात शिवसेना आणणार हक्कभंग

विधानसभा अध्यक्षांनी कायदेशीर निकाल दिला

उदाहरण देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आताची जी काही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील फळी होती, ती संविधानानुसार नव्हती. जे संविधान त्यांनी न्यायालयात दिलं होतं, त्याप्रमाणे निवड झाली नव्हती. त्यामुळे जर निवडच संविधानानुसार झाली नाही तर ते नियमानुसार पात्र होतच नाही. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. अर्थात आता कायदेतज्ज्ञ त्याचं विवेचन करतील. त्यानंतर ठाकरे गटाला काय करायचे ते करतील. पण मला या गोष्टीचं समाधान आहे की, एक अतिशय योग्य आणि कायदेशीर निकाल अध्यक्षांनी दिला आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अपात्रतेच्या निकालावर प्रतिक्रीया दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -