घरताज्या घडामोडी5 क्विंटल कांद्याच्या विक्रीनंतर शेतकऱ्याला केवळ 2 रुपयांचा चेक; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर...

5 क्विंटल कांद्याच्या विक्रीनंतर शेतकऱ्याला केवळ 2 रुपयांचा चेक; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Subscribe

‘एका शेतकऱ्याने 17 फेब्रुवारी 2023 रोजी 5 क्विंटल कांद्याची विक्री केली. याबाबत त्याला केवळ 2 रुपयांचा चेक देण्यात आला. राजेंद्र तुकाराम चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव असन त्याला हा 2 रुपयांचा चेक तीन आठवड्यांनी देण्यात आला’, असे सांगत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात किती योजना मांडण्यात आल्या, त्यापैकी किती योजना पूर्ण झाल्या. किती योजना अपूर्ण राहिल्यात याचा आढावा घेतला. तसेच, ज्या कामांना स्थगिती मिळाली आहे, ती कामे कशी पूर्ण होतीत याचीही आम्ही आज आढावा घेतला. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला एक गोष्ट जाणवली की, या अधिवेशनाच्यानिमित्ताने महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांकांचे प्रश्न मांडून दोन्ही सभागृहात मांडून त्याला न्याय कसा देता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मात्र, आम्ही एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नॉर्मच्यापेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकची रक्कम दिल्याचे वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने सांगण्यात येते. परंतु, आम्ही ज्यावेळी महाराष्ट्रातील विविध भागांत फिरलो, त्यावेळी जाहीर केलेली मदत अद्याप सर्वत्र पोहोचलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतीमालाला किंमत नाही, असे निदर्शनास आले’, असे अजित पवार यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याचे सांगताना अजित पवार यांनी एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचे उदाहरण दिले. ‘एका शेतकऱ्याने 17 फेब्रुवारी 2023 रोजी 5 क्विंटल कांद्याची विक्री केली. याबाबत त्याला केवळ 2 रुपयांचा चेक देण्यात आला. राजेंद्र तुकाराम चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव असन त्याला हा 2 रुपयांचा चेक तीन आठवड्यांनी देण्यात आला. ही राज्यातील कांदा उत्पादकाची दुरावस्था आहे’, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

‘कांदा उत्पादकांना न्यायदेण्यासाठी कांद्यांची निर्यात केली पाहिजे, त्यानंतर लगेचच काद्याचे भाव वाढतील. बांगलादेशमध्ये प्रचंड कांद्याची मागणी आहे. ज्याप्रकारे साखर उत्पादकाला न्याय देण्यासाठी साखरेची निर्यात केली. त्यापार्श्वभूमीवर काद्यांचीही निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा’, असेही अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील विधानभवनातील विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, अनिल परब, जितेंद्र आव्हाड, अजय चौधरी, कपिल पाटील, सचिन आहिर, विनोद निकोले आदी मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे नेते छत्तीसगढच्या रायपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र बाळासाहेब थोरात आणि अन्य नेत्यांनी दूरध्वनीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा केली आणि बैठकीतील निर्णयांना पाठिंबा व्यक्त केला.


हेही वाचा –  जनतेचा पैसा जनतेसाठी लावा, पालिकेतील फिक्स्ड डिपॉझिटबाबत फडणवीसांचं प्रत्युत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -