घरमनोरंजनकोरिया दूतावासातील कर्मचाऱ्यांना 'नाटू नाटू' गाण्याची भूरळ; नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

कोरिया दूतावासातील कर्मचाऱ्यांना ‘नाटू नाटू’ गाण्याची भूरळ; नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

Subscribe

साऊथचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाने गेल्या वर्षभरापासून नवनवीन रेकॉर्ड बनवले आहेत. या चित्रपटाला फक्त भारतीय प्रेक्षकांचीच नव्हे तर संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवला होता. शिवाय आता या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळलं आहे. आता अशातच कोरिया दूतावासातील कर्मचाऱ्यांना देखील ‘नाटू नाटू’ गाण्याची भूरळ पडलेली दिसत आहे. या गाण्यावरील त्यांच्या डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या डान्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले आहे.

कोरिया दूतावासातील कर्मचाऱ्यांना ‘नाटू नाटू’ गाण्याची भूरळ

भारतातील कोरियाच्या दूतावासाने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात कोरियाचे राजदूत चांग जे बोक यांच्यासोबत दूतावासात काम करणारे इतर कर्मचारी देखील ‘RRR’मधील ‘नाटू नाटू’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओसोबत कॅप्शन लिहिलंय की, ‘तुम्ही नाटूला ओळखता का? कोरियाच्या दूतावासाचे ‘नाटू नाटू’ नृत्य कव्हर शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे. तुम्ही या गाण्यावर कोरियन राजदूत चांग जे बोक यांच्यासह संपूर्ण स्टाफचा धमाकेदार नृत्य देखील पहा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

- Advertisement -

सध्या कोरियाच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत लिहिलंय की, “जीवंत आणि मोहक सांघिक प्रयत्न”

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्याबद्दल नाटू-नाटूचे अभिनंदन केले होते. याशिवाय कोरियन दूतावासातील कर्मचार्‍यांच्या नृत्य कौशल्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘RRR’ चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये डंका; हॉलिवूड क्रिटिक्स 2023 मध्ये पटकावले पुरस्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -