घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांबद्दल राऊतांनी केलेल्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटाकडून आंदोलन

मुख्यमंत्र्यांबद्दल राऊतांनी केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटाकडून आंदोलन

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अंतर्वस्त्रवर वादग्रस्त वक्तव्य होते. याविरोधात शिंदे गटाकडून आज आंदोलन करण्यात आले. यात शिंदे गटाने संजय राऊत यांच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अंतर्वस्त्र घातलेले बॅनर घेऊन आंदोलन करण्यात आले. शिंदे गटाने मुलुंडमध्ये संजय राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हे आंदोलन केले. यावेळी संजय राऊतांच्या बॅनरला जोडे मारून घोषणा मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

संजय राऊतांनी शुक्रवारी (13 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतावर टीका केली होती. यावेळी नितेश राणे म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल संजय राऊतांनी अश्लील भाषेचा वापरताना लाज वाटली नाही. तुमच्या अंडरवेअरवर नेमका कुणाचा बिल्ला लागला आहे. त्यावर मशाल चिन्ह आहे की घड्याळ आणि हाताचा पंजा आहे, असा सवाल करत टीका केली होती. नितेश राणे पुढे म्हणाले, संजय राऊतांनी मी आठवण करून तो की, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. तेव्हा राज्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली? तुम्ही ठाकरे घरात भांडण लावत होतात, अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

 

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंची अंतर्वस्त्र पाहिली तर…”, संजय राऊतांची बोचरी टीका

- Advertisement -

संजय राऊत नेमके काय म्हणाले

लोकसभा झाल्यानंतर शिंदे-अजित पवार गट असेल हे सर्वजण भाजपमध्ये जाणार आहेत, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “शिंदे आताच भाजपमध्ये आहेत ना. तेव्हा कशाला जायाला पाहिजे. तुम्ही त्यांची अंतर्वस्त्र पाहिलीत तर त्याच्यावर कमळच आहे. शिंदेंनी फुल पँटच्या आतमध्ये खाकी हाफ चड्डी आताच घालायला सुरुवात केली आहे आणि आतमध्ये कमळाची अंडरवियर आहे. तुम्ही जर कधी गेलात तर त्यांना दाखवायला सांगा. त्याशिवाय ते मुख्यमंत्री आणि मंत्रीपदी राहू शकत नाही. नंतर कशाला जायला पाहिजे. ते आताच गेले आहेत. आताच ते गुलाम झाले आहेत आणि गुलामाना स्वता:चे मत आणि स्वाभिमान नसतो”, अशी बोचरी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -