घरताज्या घडामोडीAhmednagar Hospital Fire : राज्यपालांच्या आदेशाने डॉ. पोखरणांचे निलंबन रद्द झाल्याचे वृत्त...

Ahmednagar Hospital Fire : राज्यपालांच्या आदेशाने डॉ. पोखरणांचे निलंबन रद्द झाल्याचे वृत्त खोटे, राजभवन कार्यालयाचा खुलासा

Subscribe

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु त्यांचे निलंबन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रद्द केले असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोणत्याही अधिकाराचा वापर करुन रद्द केले नाही असे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या स्तरावरच पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आले असून पदस्थापना देण्यात आली असल्याचे राजभवनाने सांगितले आहे.

महाराष्ट्र राजभवनाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन रद्द आणि पदस्थापनाबाबत जी चुकीची माहिती प्रसारित होत होती. त्याचा खुलासा करण्यात आला आहे. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच करण्यात आली असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याचे आज राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णतः निराधार व कल्पित असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांचे राज्य शासनाकडून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर डॉ सुनील पोखरणा यांनी दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी या निलंबनाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींना अनुसरून राज्यपालांकडे दाद मागितली होती. या संदर्भात राज्यपालांनी १६ मार्च २०२२ रोजी राजभवन येथे सुनावणी ठेवली होती तसेच या सुनावणीसाठी अर्जदार डॉ सुनील पोखरणा तसेच प्रतिवादी म्हणून शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना उपस्थित राहण्याबाबत कळविले होते.

सुनावणीच्या वेळी राज्य शासनाने डॉ सुनील पोखरणा यांचे निलंबन १५ मार्च २०२२ रोजीच रद्द केले असून त्यांची पदस्थापना वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, शिरूर, जिल्हा पुणे या पदावर केली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव नीलिमा केरकट्टा यांनी राज्यपालांना सांगितले. त्यामुळे राज्यपालांच्या आदेशावरून डॉ पोखरणा यांचे निलंबन रद्द झाले किंवा त्यांची पदस्थापना झाली हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Devendra Fadnavis road show in nagpur : २०२४ मध्ये भाजपचंच सरकार येणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -