घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या लंडनमधील घरांच्या चाव्या अजय अशरांकडे असतील...; राऊतांचा शिंदेंना टोला

उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील घरांच्या चाव्या अजय अशरांकडे असतील…; राऊतांचा शिंदेंना टोला

Subscribe

आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे लंडमध्ये सर्वसुविधायुक्त घर असल्याचे म्हटले.

मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर संजय राऊत दरदिवशी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला चढवत असतात. दरम्यान काल जळगावातील पाचोऱ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना लंडमध्ये उद्धव ठाकरेंचे घर असल्याचे बोलले होते. यावर बोलताना संजय राऊतांनी शिंदेना चांलगाच टोला लगावला आहे.(Ajay Usher will have the keys to Uddhav Thackerays London houses…Rautas Tola to Shinde)

आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे लंडमध्ये सर्वसुविधायुक्त घर असल्याचे म्हटले. मग यात जास्त काही माहिती पण, त्या घराच्या चाव्या मग अजय अशर नावाच्या बिल्डरांकडे असतील. असे बेच्छूट आरोप करून 50 खोक्याचे आरोप पुसले जाणार नाहीत असेही प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

- Advertisement -

मुंबईसह राज्यात बिल्डरांचे राज्य

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, या मुंबईत ठाण्यासह संपूर्ण राज्यामध्ये सध्या बिल्डरांचे राज्य आहे. हे सगळ्यांनी माहिती आहे आणि यातून केलेली कमाई परदेशात कोणाच्या माध्यमातून कोणत्या बिल्डरांच्या माध्यमातून जाते हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. तर आम्हाला बदनाम करून तुमचे डाग धुतले जाणार नसल्याचेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : केंद्र सरकार रडीचा डाव खेळत आहे; संजय राऊतांचा भाजपवर हल्ला

- Advertisement -

तुम्हाला जनताच ‘काढा’ देणार

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुमच्यावर का टीका करायची नाही. तुम्हाला जनताच काढा देणार आहे. काढा यांना कायमचे बाहेर काढा यांना असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : अजित पवार गटाचे X अकाऊंट सस्पेंड; कशामुळे झाले असे? वाचा-

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावातील पाचोऱ्यात झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. ते म्हणाले की, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे मला म्हणाले, हाऊ इज ‘यूटी’ मी ‘व्हाय’ (यूटी म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे) ते दरवर्षी लंडनला येतात, मोठमोठ्या प्रॉपर्ट्या खरेदी करतात, मोकळी हवा खातात. मी तुम्हाला सर्व माहिती देतो, लंडनला या मी तुम्हाला सर्व काही सांगतो, त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नये; अन्यथा ‘पाटणकर’ काढा घ्यायची वेळ येईल असा इशारा शिंदे यांनी ठाकरे यांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -