घरमहाराष्ट्रअजित पवार गटाचे X अकाऊंट सस्पेंड; कशामुळे झाले असे? वाचा-

अजित पवार गटाचे X अकाऊंट सस्पेंड; कशामुळे झाले असे? वाचा-

Subscribe

राज्यातील राजकारणात सध्या कधी काय होईल सांगता येत नाही. मात्र, घडणारी प्रत्येक घडामोड ही अनेक पातळीवर परिणाम करून जाते.

मुंबई : राष्ट्रवादी बंड करून सत्तेत सहभाही झालेल्या अजित पवार गटाचे X अकाऊंट (Tweeter) फॉलो करत असाल तर थांबा. कारण, तुम्हाला आता त्यावर काहीच दिसणार नाही. कारण, अजित पवार गटाचे ट्वीटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले असून, यामागील कारणांचाही खुलासा करण्यात आला आहे. (Ajit Pawar groups X account suspended What caused it read)

राज्यातील राजकारणात सध्या कधी काय होईल सांगता येत नाही. मात्र, घडणारी प्रत्येक घडामोड ही अनेक पातळीवर परिणाम करून जाते. यादरम्यान ज्याप्रकारे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी सोबतही तेच झाले. सध्या दोन्ही पक्षांचे दोन दोन गट आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजप सोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले या दोन्ही गटांचे सोशल मीडियावरील अकाउंट देखील वेगळे आहेत. परंतू आता याच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे एक्स अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) कडून अजित पवार गटाचे अधिकृत अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : केंद्र सरकार रडीचा डाव खेळत आहे; संजय राऊतांचा भाजपवर हल्ला

नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई

आज सकाळी ज्यांनीही अजित पवार गटाच्या अकाऊंटवर जाण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना ट्विटरकडून अकाउंट सस्पेंड केल्याचा मॅसेज पाहायला मिळाला आहे. ही कारवाई नियमांचे उल्लंघन केल्यामुळे करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र नेमके कारण अद्यापही अस्पष्टच आहे.

- Advertisement -

हेही वाचा : MEO च्या सक्षमता प्रमाणपत्र परीक्षेत ‘मुन्नाभाई’; चक्क हॉटेलमध्ये बसून सोडवली प्रश्नपत्रिका

आमदारांची धाकधूक वाढली

एकीकडे शरद पवार हे ज्या ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत. त्यानंतर अजित पवार गटाकडूनही त्याच ठिकाणी सभा घेऊन उत्तर दिले जात आहे. दरम्यान दुसरीकडे शरद पवार गटाकडून अजित पवार गटातील आमदारांवर अपात्रतेसाठी कारवाई करावी यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे आणि विधानपरिषदेच्या उपसभापतींकडे अर्ज केले आहे. त्यामुळे आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. अशातच आज ट्वीटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -