घरमहाराष्ट्रकेंद्र सरकार रडीचा डाव खेळत आहे; संजय राऊतांचा भाजपवर हल्ला

केंद्र सरकार रडीचा डाव खेळत आहे; संजय राऊतांचा भाजपवर हल्ला

Subscribe

खासदार संजय राऊत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

मुंबई : आज शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीबाबात माहिती देतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजवर हल्ला चढवला असून, केंद्र सरकार हे रडीचा डाव खेळत असल्याची टीका त्यांनी केली आहे.(The central government is playing a dirty trick Sanjay Rauts attack on BJP)

खासदार संजय राऊत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, इंडिया आघाडीची आज शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक आहे. या बैठकीला हजर राहणाऱ्या तृणमुल कॉंग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. हा रडीचा डाव आहे. ही बदल्याची कारवाई आहे. गेल्या काही वर्षापासून त्यांच्यावर सुडबुद्धीचे राजकारण सुरू आहे. हेमंत सोरेन, आणि इतरांवरही दवाब आहे. आम्ही यातून मार्ग असा काढला आहे की, झुकायचे नाही. बॅनर्जींना उपस्थित राहता येऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. परंतू आम्ही बैठकीत त्यांच्या नावाची खूर्ची रिकामी ठेवणार असून, यातून आम्ही वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

आम्ही लढाई सत्तेसाठी नाही तर…

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपात कोणतीही अडचण येणार नाही. आमची लढाई सत्तेसाठी नसून हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी आहे. आणि जेंव्हा अशी लढाई सुरू होते तेव्हा वैयक्तीक स्वार्थ बाजुला ठेवले जातात असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा : MEO च्या सक्षमता प्रमाणपत्र परीक्षेत ‘मुन्नाभाई’; चक्क हॉटेलमध्ये बसून सोडवली प्रश्नपत्रिका

- Advertisement -

फडणवीसांना बाहेर देशातही पाठवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशातील पाच राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकींच्या प्रचारासाठी गेले आहेत यावर विचारले असता राऊत म्हणाले की, जे कालपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री होते ते आज उपमुख्यमंत्री आहेत. ते कुठेही जाऊ शकतात. जशा आपल्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका आहेत तशा आपल्या देशासह इतर पाच देशांतही बाहेर निवडणुका आहेत त्यांना तेथेही पाठवा असाही टोला फडणवीसांना राऊतांनी मारला.

हेही वाचा : Jalna Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी माफी मागायला नको होती; अजित पवारांच्या वक्तव्याने वाद चिघळणार?

या सरकारव कुणाचाच विश्वास नाही

जरांगे पाटील यांच्या उपोषणावर बोलतान खासदार संजय राऊत म्हणाले की, शेवटी सरकारसोबत विश्वासाचे नाते राहले नाही. जे फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ असे सांगितले होते ते अद्यापही दिले नाही. फडणवीस आता का देत नाहीत आरक्षण. जरांगे पाटलांची भूमिका योग्य आहे. कोणावरच कसा विश्वास ठेवावा. 16 सप्टेंबर आधी सरकारला जरांगे पाटील यांचे उपोषण गुंडाळण्याचे काम सुरु आहे परंतू जरांगे पाटील गे गुंडाळण्यातील नाही असेही संजय राऊत म्हणाले.

भाजपच जबाबदार

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, या राज्यातील वातावरण सध्या अस्थिर झाले आहे. जातीपातीत फाटले आहे. याला दुसरे कुणी नसून भाजपच जबाबदार आहे. तर देवेंद्र फडणवीस जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून या महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -