घरमहाराष्ट्रAjit Pawar : देशाचं सांगू शकत नाही पण...; 'दादां'चे प्रकाश आंबेडकरांच्या भाकितावर...

Ajit Pawar : देशाचं सांगू शकत नाही पण…; ‘दादां’चे प्रकाश आंबेडकरांच्या भाकितावर भाष्य

Subscribe

ते रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वैचारिक मंथन शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

कर्जत (रायगड) : राज्यात आणि देशात सहा डिसेंबरनंतर जातीय दंगली घडतली असे भाकित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. या भाकिताबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता देशाचे सांगू शकत नाही पण महाराष्ट्रात आम्ही तसे काही होऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्टच सांगून टाकले. (Ajit Pawar  Cant say about the country but… Dadaan Commentary on Prakash Ambedkars Predictions)

ते रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वैचारिक मंथन शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

यावेळी अजित पवार म्हणाले की, देशाचं मी सांगू शकणार नाही. कारण देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी अमित शहा यांच्यावर आहे. ती त्याठिकाणी सांभाळायला खंबीर आहेत. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, मी आणि एकनाथ शिंदे आम्ही काम करतोय. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कुठलंही काही घडणार नाही. याबद्दलची काळजी खबरदारी आम्ही घेऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा: AJIT PAWAR ON DESHMUKH : देशमुख म्हणाले- ‘मी मंत्रिमंडळात नाही तर सोबत नाही’; दादांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

राऊतांचं ते भाकित खोटं

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 31 डिसेंबरनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील असे भाकित केले होते. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ते धादांत खोटं आहे. असं काही होणार नाही अशा काहीशा शब्दांत यांनी उत्तर दिलं.

हेही वाचा : Ajit Pawar : ‘मराठा समाजाला त्यांच्या न्याय, हक्काचं आरक्षण असायला हवं’; अजित पवारांनी स्पष्ट…

अजित पवार काय आहेत हे सगळ्यांना माहितीय

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. या युक्तिवादामध्ये अजित पवारांचा उल्लेख भेकड म्हणून करण्यात आला. याबाबत त्यांना विचारले असता अजित पवारांच्या वतीने सुनील तटकरे यांनी उत्तर दिले. तटकरे म्हणाले की, आम्हाला जे वाटलं, आम्हाला त्याच्या वेदना झाल्या. त्या बोलण्याचा मला अधिकार आहे, मी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आहे. त्याठिकाणी युक्तिवादामध्ये तो शब्दप्रयोग वापरला गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला काही फरक पडत नाही. अजित पवार काय आहेत ते पूर्णपणाने माहिती असल्यामुळे मी ते स्पष्टीकरण माझ्या पद्धतीने दिलेलं आहे. असे सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -