घरमहाराष्ट्र'जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे'

‘जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे’

Subscribe

माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार यांनीदेखील जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असल्याचे म्हटले आहे.

राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना सत्तास्थापनेचा तिढा मात्र अद्यापही सुटलेला नाही. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आम्ही विरोध पक्षातच बसणार हे स्पष्ट केले. तर माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार यांनीदेखील जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असल्याचे म्हटले आहे. दिवसभर राज्यात आणि दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु असतानाच राष्ट्रवादीचे नेता अजित पवार यांनीही आपले मत मांडले आहे.

काय म्हणाले अजित पवार 

  • आम्ही २४ तारखेला निकाल लागल्यापासून सतत सांगतोय
  • राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे
  • तरी तुम्ही लोकं समजून घेत नाही
  • आम्ही काल पण राज्यपाल महोदयांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी सांगितलं, आता काळजीवाहू सरकार आहे
  • तुम्ही याबद्दलचा निर्णय घ्या आणि काहीतरी तोडगा काढा
  • आता आमच्या आघाडीचा तर १४५ आकडा होऊ शकत नाही
  • आम्ही सगळे मिळून एकत्र आलो तरी आमच्याकडे ११५ च्या पुढे जात नाही
  • आता काही जण म्हणतात आमच्याकडे १७० आहेत. पण ते कुठल्या गणिताने सांगतात ते काय मला समजत नाही
  • आज पवार साहेबांना संजय राऊतसाहेब भेटले, अशी माहितीही घेतली. पण त्या दोघांमध्ये काय बोलणे झाले मला माहिती नाही
  • त्यानंतर पवार साहेबांची पत्रकार परिषद झाली
  • आम्ही आता अवकाळी पावसाच्या संदर्भात काय केलं पाहिजे काय नाही याबाबत चर्चा केली

हेही वाचा –

आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करु – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -