घरमुंबईमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंची भेट; नाट्यमय घडामोडींनंतर पुन्हा युतीचे सरकार?

मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंची भेट; नाट्यमय घडामोडींनंतर पुन्हा युतीचे सरकार?

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आज सत्ता स्थापनेच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या तेरा दिवसांपासून राज्यात प्रलंबित राहिलेला सत्ता स्थापनेचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण आज अखेर तेरा दिवसांनी शिवसेनेच्या नेत्यांनी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे ६ मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेनेच्या २ मंत्र्यांनी सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.


हेही वाचा – १०५ आकडा ज्यांचा आहे त्यांनी सरकार बनवावे; राऊत यांची गुगली

- Advertisement -

शिवसेना पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत?

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यंमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत सत्ता स्थापनेवर चर्चा झाली. भाजप शिवसेनेसोबत समसमान मंत्रीवाटप करायला तयार झाले आहे. याशिवाय राज्य सरकारमध्ये एक सुकाणू समिती असावी आणि त्या समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असावेत, असा प्रस्ताव भाजपकडून असल्याचे समजते आहे. त्यामुळे शिवसेना भाजपला पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

राष्ट्रवादी विरोधी बाकावर बसण्यावर ठाम

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आपण विरोधी बाकावर बसण्यावर ठाम असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ‘राज्यातील जनतेने शिवसेना आणि भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे सेना आणि भाजपने लवकरात लवकर सरकार स्थापन करावे. आम्हाला जनतेने विरोधात बसण्याची संधी दिली आहे. पण ज्यांना लोकांनी संधी दिली त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे आणि आम्हाला विरोधात बसण्याची संधी द्यावी. आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करु’, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -