घरमहाराष्ट्रपुणेNCP : पुरावे द्या, अन्यथा...; अजित पवार गटाच्या आमदाराचे थेट शरद पवारांनाच...

NCP : पुरावे द्या, अन्यथा…; अजित पवार गटाच्या आमदाराचे थेट शरद पवारांनाच आव्हान

Subscribe

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावर कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचे आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांना आता सुनील शेळके यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

पुणे : लोणावळ्यात आज (ता. 07 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला स्वतः शरद पवार यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात पवारांनी आमदार सुनील शेळके यांना इशारा दिला. “कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर लक्षात ठेवा, विसरू नका की मी शरद पवार आहे.” असा इशाराच शरद पवारांकडून देण्यात आला. ज्यानंतर त्यांच्या या इशाऱ्याला आमदार सुनील शेळके यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शरद पवारांनी माझ्यावर केलेले आरोप खरे करून दाखवावे, असे आव्हानच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार सुनील शेळके यांच्याकडून देण्यात आले आहे. (Ajit Pawar group MLA Sunil Shelke directly challenged Sharad Pawar)

हेही वाचा… Sharad Pawar : ‘माझ्या वाटेला गेलात तर…’, शरद पवारांचा अजितदादांच्या आमदाराला इशारा

- Advertisement -

लोणावळ्यातील कार्यक्रमात शरद पवारांनी सुनील शेळके यांच्यावर आरोप केल्यानंतर काहीवेळातच आमदार शेळके यांनी पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेळकेंनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिले. माझ्यावर केलेले आरोप पवारांनी सिद्ध करून दाखवावे, अन्यथा ते खोटे आरोप करतात, असे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल, असेही शेळके यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर आजच्या कार्यक्रमाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे कमी कार्यकर्ते आल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आल्याचेही आमदार शेळके यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेतून शरद पवार यांच्यावर निशाणा साधत आमदार सुनील शेळके म्हणाले की, आज मावळ मतदारसंघात शरद पवारांनी मविआची बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे ज्यांनी आयोजन केले होते, त्यांनी आठवड्याभरापूर्वी शरद पवारांना खोटी माहिती दिली होती. अजित पवारांच्या गटातील पदाधिकारी शरद पवारांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश करू इच्छित आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू असताना साधारणतः केवळ 35-40 कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे मविआच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवण्यात आले होते. त्यावेळी आमदार सुनील शेळकेंनी पदाधिकाऱ्यांना दम दिला, अशी खोटी माहिती शरद पवारांना देण्यात आली आणि ज्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शरद पवारांनी याबाबत वक्तव्य केले.

- Advertisement -

शरद पवार हे आजही आमच्यासाठी श्रद्धास्थान होते आणि आहेत. पण, त्यांनी याबाबतीत वक्तव्य करताना शाहनिशा करणे अपेक्षित होते. मागील 55 वर्षांची साहेबांची राजकीय वाटचाल पाहिली, तर त्यांनी कोणावर व्यक्तिगत टीका केली नाही. पण, माझ्याबाबती शरद पवाारांनी असे वक्तव्य का केले, याचे मलाही आश्चर्य वाटते. त्यामुळे, मी शरद पवारांना भेटणार, माझी काय चूक झाली ते सांगा, असे विचारणार. तर जसे त्यांनी सांगितले की, मी कोणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झाली हे मला आपण सांगावे, असेही त्यांना म्हणणार असल्याचे सुनील शेळके यांच्याकडून सांगण्यात आले. तर, ज्यांनी मी दमदाटी दिल्याची माहिती दिली, ती माहिती खरी दिली की खोटी, हे आपण जाणून घ्यावे, असेही शरद पवारांना विचारणार असल्याचे आमदार शेळकेंनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -