घरमहाराष्ट्रAjit Pawar on Amol Kolhe : जेव्हा कोणी मिळत नाही तेव्हाच...का म्हणाले...

Ajit Pawar on Amol Kolhe : जेव्हा कोणी मिळत नाही तेव्हाच…का म्हणाले अजित पवार असं?

Subscribe

शिरुर (जि. पुणे) : माझ्यावर विश्वास ठेवत, मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं, पण तो बाबा थोड्याच दिवसात राजीनामा द्यायचा आहे, असं सांगायला लागला. मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येत नाही, माझ्या क्षेत्रात माझं नुकसान होतंय, असं सांगत कोल्हे राजीनामा द्यायच्या तयारीत होते, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. मुळात राजकारण हा कोल्हे यांचा पिंड नाही. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित शेतकरी मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – BMC : आयुक्त खुर्चीला चिकटून, पण पालिकेत 52 हजारांहून अधिक पदे रिक्त

- Advertisement -

निवडून आल्यावर राजीनाम्याची भाषा

राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले आणि मग त्यांनी राजीनामा दिला, कारण राजकारण हा कलाकारांचा पिंड नसतो. त्यांना मतदारांचं काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमचीच चूक आहे. मध्यंतरी शिवनेरीवर मला खासदार भेटले. काय हो डॉक्टर, आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. तर ते म्हणाले, अहो दादा, आता परत लढायची इच्छा झाली.

गेल्यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांना मतदान करा हे सांगायला मी इथं आलो होतो. दुसऱ्या पक्षातून त्यांना आमच्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. मी आणि दिलीपरावांनी ती जबाबदारी घेतली. दिलीपरावांनी जुन्नर, खेड आणि आंबेगावची जबाबदारी घेतली. माझ्यावर भोसरी, शिरुर आणि हडपसर ही जबाबदारी होती. त्यानुसार ही जागा निवडून आणली. निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे. दिसायला चांगला आहे. पुढे काहीतरी चांगले काम करेल. पण दोन वर्ष झाली आणि त्यांनी मला म्हटलं दादा, मला राजीनामा द्यायचा आहे असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Asim Sarode : ‘तुला काय स्वप्न पडलं का?’…लैंगिक अत्याचाराच्या सरोदेंच्या आरोपांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

लोकं जोड्याने मारतील…

अमोल कोल्हे माझ्याकडे आले, त्यांनी मला राजीनामा द्यायचा आहे असं म्हटलं. त्यावर मी बोललो, जनतेनं आपल्याला ५ वर्षासाठी निवडून दिले आणि २ वर्षात राजीनामा दिला तर लोक जोड्याने मारतील, असं करू नका. तुमची अडचण काय असं मी विचारले, तेव्हा दादा मी कलावंत आहे. माझी वेगवेगळी नाटके, सिनेमा आहेत त्यावर परिणाम होतोय असं कोल्हेंनी म्हटलं असं सांगत अजित पवार पुढे म्हणाले, मी खोटं बोलणार नाही. कोल्हेंना म्हटलं असं करू नका. दिसायला खराब दिसते त्यावर कोल्हेंनीही उत्तर दिले. “मी सेलिब्रिटी आहे. लोकांना वाटतं मी रोज मतदारसंघात यावे कसं शक्य आहे? मला माझी मालिका असते, त्याठिकाणी काम करावे लागते. मग ते कोण बघणार? माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असे त्यांचे शब्द होते असं अजित पवारांनी यावेळी सांगितले. एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर सेलिब्रिटी काढायचे. शेवटी त्या भागातील विकासकामे करण्याची आवड आहे का हे पाहायला हवे. यात आमचीही चूक आहे. कुणाच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला मार्ग नाही असं सांगत अजित पवारांनी कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केल्याचं कबूल केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -