घरमहाराष्ट्रनागपूरMaharashtra Politics : नवनीत राणांचा भाजपात प्रवेश? चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले...

Maharashtra Politics : नवनीत राणांचा भाजपात प्रवेश? चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले…

Subscribe

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा या कधीही जाहीर होऊ शकतात. भाजपाने देखील लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे उमेदवार अद्यापही निश्चित झाले नसले तरी काहींची नाव चर्चेत आहेत. त्यापैकी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचेही नाव भाजपाकडून चर्चेत आहे. परंतु, नवनीत राणा या भाजपात नसल्याने त्या निवडणुकीसाठी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राणा दाम्पत्य भाजपामध्ये प्रवेश करणार की नाही? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळाले आहे. (Maharashtra Politics : Chandrasekhar Bawankule spoke clearly on Navneet Rana entry into BJP)

हेही वाचा… Loksabha Election 2024 : “लोकसभेच्या 22 जागांसाठी आग्रही”, शिंदे गटाच्या दोन आमदारांची माहिती

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. याबबात आज (ता. 04 मार्च) नागपूरच्या मेळाव्यात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशाची कोणतीही चर्चा नाही. नवनीत राणा यांना तसेच इतर मित्रपक्षांना आम्ही संमेलनाला बोलवले आहे. त्यांचा कोणताही पक्षप्रवेश नाही. त्या आमच्या सहयोगी म्हणून या संमेलनाला उपस्थित राहतील. ज्यानंतर आता राणा दाम्पत्याच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

तर याचबबत खासदार नवनीत राणा यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्या प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने आयोजित केलेले संमेलन हे युवकांसाठी आहे. मी एक तरुण खासदार असून भाजपाची सहयोगी आहे. त्यामुळेच त्यांनी मला आमंत्रण दिले आहे. भाजपामध्ये माझी चर्चा होत आहे, हीच मोठी गोष्ट आहे. मला त्याचा आनंद आहे, असे नवनीत राणा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी महाघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी अचानकपणे आपली भूमिका बदल भाजपा-शिवसेना युतीला पाठिंबा देण्यास सुरुवात केली. तर ज्या महाआघाडीकडून निवडणूक लढवून त्या खासदार झाल्या, त्यांच्याच विरोधात बोलू लागल्याने अमरावतीतील राजकीय वातावरण तापले होते. परंतु आता तर राज्यातीलच राजकीय समीकरण बदलल्याने अमरावतीतील राजकीय समीकरणही बदल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -