घरताज्या घडामोडीशरद पवारांचा पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर फोन म्हणाले...., अजित पवारांची पवार-मोदी भेटीवर प्रतिक्रिया

शरद पवारांचा पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर फोन म्हणाले…., अजित पवारांची पवार-मोदी भेटीवर प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यावर मला आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माहिती दिली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. पवार-मोदी यांच्या भेटीनंतर समाजामध्ये चुकीची माहिती देऊन गैरसमज पसरवण्याचे काही जण प्रयत्न करत आहेत असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच वाढत्या इंधन दरावरुनही अजित पवारांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्राचा पेट्रोल डिझेलवरील कर राज्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे केंद्र सरकारने दिलासा द्यावा असे अजित पवार म्हणाले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की, ज्या सर्वोच्च नेत्यांना भेटले पाहिजे तिथे शरद पवार भेटले आहेत. एखादी गोष्ट आपण सांगायला गेला तर असं झालं तसं बोललो असं कोणी सांगत नाही. परंतु मोदींच्या भेटीबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले जे महत्त्वाचे विषय होते त्याच्यावर पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली आहे. अशी माहिती पवारांनी मला आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सांगितली आहे. बातमी आल्यावर आम्ही पवारांना फोन केला होता. बातमीची माहिती घेण्यासाठी फोन केला होता. त्यांना भेट झाली का विचारले यावर ते म्हणाले भेट झाली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे. काही जण जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या बातम्यांचा विपर्यास करुन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

केंद्राने इंधनावरील कर कमी करावा

मला राज्याच्या दृष्टिकोनातून राज्य चालवायचे आहे. नवीन कर लावायचा नाही. नवीन टॅक्स कोणताही लावला नाही. उलट हजार कोटींचा टॅक्स गॅस संदर्भात कमी केला. हे आम्ही एक प्रकारे हलक्या वजनाच्या वाहनांसाठी मदत केली आहे. काही लोकं सांगत आहेत. राज्याने पेट्रोल डिझेलचे टॅक्स कमी करावेत मग केंद्रानेही कमी केले पाहिजेत. केंद्राचे आमच्या पेक्षा जास्त टॅक्स आहेत. अशा शब्दात अजित पवारांनी विरोधकांना सुनावले आहे. राज्यात ३ कोटी २५ लाख उत्पन्न मिळालं आहे. मागील वर्षी २ कोटी ६९ लाख रुपयांच उत्पन्न मिळाले होते.

समाजात तेढ वाढवण्यापेक्षा सामाजिक प्रश्नाकडे लक्ष द्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्यात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरी पाडण्यात येत आहे. यापेक्षा देशातील महागाई आणि सामाजिक प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे असे अजित पवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे हायकोर्टाचे आदेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -