घरमहाराष्ट्रविरोधकांना संपविण्याचा प्रयत्न होत असेल तर, महाराष्ट्र सहन करणार नाही : अजित...

विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न होत असेल तर, महाराष्ट्र सहन करणार नाही : अजित पवार

Subscribe

पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर विरोधी पक्षनेते यांनी पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीमुळे राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर विरोधी पक्षनेते यांनी पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमकीमुळे राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर प्रसार माध्यमांसमोर हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली. पण जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलं. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणे हे सरकारचे काम
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी आल्याचे प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे आव्हाड हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे घडले त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रातील नागरिकाला सुरक्षा देणे हे सरकारचे काम आहे. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणे हे सुद्धा सरकारचे काम आहे,’ असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करत असाल तर…
मात्र, अशा प्रकारे जर का विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न काही लोक करतील असतील आणि सरकार त्याकडे डोळेझाक करत असेल तर महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही, असेही अजित पवार यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. तसेच वास्तविक हे अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतले पाहिजे. कारण तो विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा विभाग म्हणून ओळखला जातो आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोलीस खाते आहे. कायदा सुव्यवस्था चांगली राखणे हे दोघांचे काम आहे. यासंदर्भात ज्या बातम्या आल्या आहेत. त्याच्यामध्ये कोण खरं बोलतंय?, याच्या पाठीमागे कोण आहे?, कोणी सुपारी दिली? त्याचे कारण काय? हे सर्व शोधून लोकांच्या समोर आले पाहिजे. तसेच जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला सुरक्षा दिली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांच्याकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांची नेमणूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -