घरमहाराष्ट्रपाणी प्रश्नावर निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू- आमदार नितीन देशमुख

पाणी प्रश्नावर निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू- आमदार नितीन देशमुख

Subscribe

आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले.

अकोल्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून आमदार नितीन देशमुख यांनी पाणी प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली होती. अकोल्याहून निघालेली ही संघर्ष यात्रा नागपूरकडे निघाली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच हे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी नागपूरच्या वेशीवरच ही संघर्ष यात्रा अडवली. त्यामुळे देशमुख आणि इतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावरून आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिलाय. पाणी प्रश्नावर येत्या १० दिवसात निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराच यावेळी नितीन देशमुख यांनी दिलाय.

आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाच्या ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनासाठी वाण धरणाच्या पाण्याचा आरक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला. याच मुद्द्यावरून आमदार देशमुखांनी शिंदे-फडणवीस यांना हा इशारा दिलाय.

- Advertisement -

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार असताना आमदार देशमुख यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळापूर मतदारसंघाच्या ६९ गावातल्या पाणाीपुरवठा योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेसाठी २१९ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी १९२ कोटी रूपये या योजनेसाठी लागणार होते. १०८ कोटी रूपये आतापर्यंत या योजनेवर खर्च झाले आहेत. ९२ कोटींचं देयक कंत्राटदाराला देण्यात आलेलं आहे.

बाळापूर मतदारसंघातल्या ६९ गावांसाठी तेलेरा तालुक्यातल्या वाण प्रकल्पासाठी ३.३५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आलं होतं. तिथल्या स्थानिक नागरिकांनी बाळापूर मतदारसंघासाठी पाणी देण्यास विरोध केला होता. अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकले यांनी ही विरोध केला होता. यावर बोलताना आमदार प्रकाश भारसाकले हे गद्दार असल्याचं यावेळी नितीन देशमुख म्हणाले. भारसाकले हे गद्दार असले तरी तिथला जनता आपल्या कुटुंबातली आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाणाीपुरवठा योजनेला मंजुरी दिली होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा विचार न करता पाण्याच्या आरक्षणाला स्थगिती दिली. यावरूनच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये किती फरक आहे, हे दिसतं, असं देखील नितीन देशमुख म्हणाले.

- Advertisement -

आमदार देशमुख यांनी उपोषणाचं अस्त्र उपासून थेट फडणवीसांना इशाराच दिलाय. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय. ‘राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांकडे अधिकार असतात, पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते अधिकार नाहीत”, असं म्हणत आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -