Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र बोगस डॉक्टर पाच वर्षे सरकारी सेवेत! छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

बोगस डॉक्टर पाच वर्षे सरकारी सेवेत! छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Subscribe

 

संभाजीनगरः छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल पाच वर्षे बोगस डॉक्टर सरकारी रुग्णालयात उपचार करत होता. आरोग्य विभागाने त्याची कागदपत्रे तपासल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सिटी चौक पोलीस ठाण्यात याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

मोहसिन खान शेरखान पठाण असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. आरोग्य विभागाने कागदपत्रे तपासल्यानंतर पठाण फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस पठाणच्या गावीही गेले होते. मात्र तो सापडला नाही. त्याचे नातलग आणि मित्रांकडे पोलीस चौकशी करत आहेत.

सिल्लोड जिल्ह्यात पठाण कार्यरत होता. गेली पाच वर्षे तो आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार करत होता. त्यांना औषधं देत होता. या पदासाठी किमान बीएएमएसचं शिक्षण लागतं. मात्र त्याच्याकडे बीएएमएसचं शिक्षण पूर्ण केल्याची पदवी नव्हती. आरोग्य विभागाने कागदपत्र तपासल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार पठाण विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात कोल्हापूर येथेही बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला. बिघडलेला लॅपटॉप दुरूस्तीला देणे ह्या बोगस डॉक्टरच्या अंगलट आले. या बोगस डॉक्टरने अनेक महिलांशी अश्लील चाळे केल्याचे प्रकार उघडकीस आले. याप्रकरणी डॉक्टरविरोधात त्वरीत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगड येथे संबंधित बोगस डॉक्टरने त्याचा दवाखाना सुरू केला होता. त्याने या दवाखान्याची जाहीरात केली होती. ही जाहीरात पाहून राज्यभरातून नागरिक त्याच्याकडे उपचार घेण्यासाठी येत होते. त्यावेळी उपचारसाठी आलेल्या महिलांसोबत तो अश्लील चाळे करायचा. तसेच स्वत:च्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करायचा. विशेष म्हणजे, यामध्ये स्थानिक महिलांसह तरुण मुलींचाही समावेश आहे. या क्लिप आता सोशल मीडियावर पसरल्या असून त्यातील बहुतांशी महिलाही स्थानिकच असल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. गेल्या काही वर्षांपासून बोगस डॉक्टरांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

- Advertisment -