घरमहाराष्ट्रआज ठरणार RDCC बँकेवर वर्चस्व कुणाचे?

आज ठरणार RDCC बँकेवर वर्चस्व कुणाचे?

Subscribe

शेतकरी कामगार पक्षाने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी (आरडीसीसी) बँकेवर अनेकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. शेतकरी कामगार पक्षाने तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ या बँकेवर आपले वर्चस्व अबाधीत राखले आहे. मात्र राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर होणार्‍या बँकेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व कायम टिकवून ठेवण्यासाठी शेकापने कंबर कसली आहे.

अलिबाग: शेतकरी कामगार पक्षाने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी (आरडीसीसी) बँकेवर अनेकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. शेतकरी कामगार पक्षाने तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ या बँकेवर आपले वर्चस्व अबाधीत राखले आहे. मात्र राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर होणार्‍या बँकेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व कायम टिकवून ठेवण्यासाठी शेकापने कंबर कसली आहे. २१ जागांपैकी १८ जागांवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा बिनविरोध फडकत राहिला आहे. उरलेल्या तीन जागांसाठी आज शनिवार १६ सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या रविवार १७ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यामुळे या तीन जागांवरही विजय मिळवत शेकाप आरडीसीसी बँकेची चावी आपल्याकडेच ठेवण्यात यशस्वी ठरेल का? हे मतमोजणीनंतर सिध्द होणार आहे. (Alibag Raigad Who will dominate RDCC Bank today)

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी शनिवारी अलिबागमधीलनगरपरिषदेची उर्दू शाळा, पेणमधील सार्वजनिक विद्यालय, माणगावमधील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, खालापूरमधील प्रभाकर पाटील शिक्षण संस्थेचे गंगाविष्णू जखोटीया मेमोरिअल इंग्रजी माध्यम शाळा या चार मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली.मतदान केंद्रात सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांनी उत्साहपुर्ण वातावरणात गर्दी केली होती.

- Advertisement -

शेकापचे सरचिटणीस आमदार आणि बँकेचे चेअरमन जयंत पाटील माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ड. आस्वाद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जि. प. माजी सदस्या भावना पाटील, चित्रा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, प्रदीप नाईक, द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, बाळू पाटील, पंचायत समिती माजी सभापती प्रमोद ठाकूर आदींनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.प्राथमिक माहितीनुसार सकाळी दहा वाजेपर्यंत १८१ जणांनी, दुपारी बारा वाजेपर्यंत ५१३ व दुपारी दोन वाजेपर्यंत ६९० तसेच सायंकाळी चार वाजेपर्यंत ७२४ मतदारांनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला .मोजणी उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता जेएसएम महाविद्यालयात होणार आहे.

रायगड जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. सर्वप्रथम १९९० च्या निवडणुकीत आर.एस.पाटील बँकेचे अध्यक्ष झाले होते, त्यानंतर १९९५ पासून आताच्या निवडणुकीपर्यंत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे या बँकेचे अध्यक्ष पद भूषवत आहेत.२१ पैकी १८ जागा शेतकरी कामगार पक्षाने बिनविरोध जिंकल्या असल्या तरी तीन जागांवर निवडणुक झाल्याने शेकाप पुढे आवाहन उभे ठाकले आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: चाकरमान्यांचे हाल! कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या 5-6 तास उशिरानं )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -