घरताज्या घडामोडीपुन्हा राजकीय उलथापालथ? ठाकरे गटातील १३ आमदार संपर्कात; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

पुन्हा राजकीय उलथापालथ? ठाकरे गटातील १३ आमदार संपर्कात; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

Subscribe

राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय उलथापालथ (Maharashtra Politics) होण्याची शक्यता आहे. राज्यात गतवर्षी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. त्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला.

राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय उलथापालथ (Maharashtra Politics) होण्याची शक्यता आहे. राज्यात गतवर्षी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. त्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवाय, निवडणूक आयोगानेही शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्हाचा निकाल शिंदेंच्या बाजूने दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. अशातच आता ठाकरे गटात उरलेले आमदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी केला.

उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला. ‘ठाकरे गटातील उरलेले 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेतेही शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा अनेक चर्चा सुरू आहेत’, असे उदय सामंत म्हणाले. यावेळी उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणाही साधला आहे.

- Advertisement -

दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार असून, राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant maharashtra)

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांकडून राज्यभरात ‘अजित दादा भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर्स संपूर्ण राज्यभरात झळकवण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी चित्रा वाघ यांनी पोस्ट केला ‘तो’ व्हिडीओ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -