घरमहाराष्ट्रवाशी एपीएमसी मार्केट ११ ते १७ मे पर्यंत बंद

वाशी एपीएमसी मार्केट ११ ते १७ मे पर्यंत बंद

Subscribe

सोमवारपासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय !

एपीएमसी बाजार आवारातील अनेक घटकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात या रोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असल्याने सोमवारपासून नवी मुंबई एपीएमसीतील पाचही मार्केट १७ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार आणि एपीएमसी बाजारातील सर्व घटकाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून या निर्णयाची अंमल बजावणी करण्यात येणार आहे. एपीएमसीतील फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, कांदा बटाटा मार्केट, धान्य मार्केट व मसाला मार्केट पूर्णपणे बंद राहणार असून आठ दिवस पाचही मार्केटमध्ये दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

नवी मुंबई शहरात करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. रुग्णांचा आकडा ४८४ च्या पलिकडे गेला आहे. एकूण रुग्ण संख्या पैकी शंभरपेक्षा अधिक बाधित झालेल्या व्यक्ती या एपीएमसी मधील व्यापारी, माथाडी ,मापाडी, अधिकारी-कर्मचारी आहेत किंवा त्यांच्यामुळे बाधित झालेल्या त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील इतर व्यक्ती आहेत. अनेकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.

- Advertisement -

एपीएमसीमध्ये दररोज दुपटीने मालाची आवक होते. सहाजिकच त्यामुळे गर्दीही होते. सोशल डिस्टन्सिंग पुरेसे पाळले जात नाही. एपीएमसीमध्ये झपाट्याने वाढणार्‍या करोनाच्या संसर्गामुळे बाजार आवारात भीतीचे वातावरण आहे.

ही भीती येथील घटकांच्या मनामध्ये एवढी बसली आहे की काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी बाजार समिती व्यवस्थापनाकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केलेले आहेत. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आणि समाजातील इतर व्यक्तींच्या जीवाशी खेळ नको अशी भूमिका येथील घटकांनी घेतली आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून एपीएमसीमधील घटकांचे करोना संसर्गापासून रक्षण करण्यासाठी त्याच बरोबर बाजार आवारातील संसर्गाचा नवी मुंबई शहरात इतरत्र फैलाव रोखण्यासाठी परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत एपीएमसी तात्काळ बंद करावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी देखील केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -