घरमहाराष्ट्रआंबेनळी घाट दुर्घटना प्रकरण; प्रकाश सावंत देसाई यांची बदली

आंबेनळी घाट दुर्घटना प्रकरण; प्रकाश सावंत देसाई यांची बदली

Subscribe

आंबेनळी घाट बस अपघात प्रकरणात बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची अखेर दापोली कृषी विद्यापीठाने बदली केली आहे. रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयात त्यांची बदली करण्यात आली आहे.

आंबेनळी घाट बस दुर्घटना प्रकरणात वाचलेले प्रकाश सावंत देसाई यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाडून निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयात त्यांची बदली करण्यात आली आहे. आंबेनळी घाटात बस दुर्घटनेनंतर प्रकाश सावंत देसाई यांच्यावरुन दापोलीमध्ये संशयाचे वातावरण होते. मृतांच्या नातेवाईकांनी प्रकाश सावंत देसाई यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी कृषी विद्यापीठावर मोर्चा देखील काढला होता.

अशी घडली होती घटना

आंबेनळी घाटामध्ये २८ जुलैला सकाळी दहा वाजता दापोली कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात झाला होता. सलग सुट्टी आल्यामुळे हे सर्व कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघाले होते. महाबळेश्वरला पोहचण्या आधीच त्यांच्या बसला अपघात झाला. बस आंबेनळी घाटात दरीमध्ये कोसळली. या बसमधून ३३ कर्मचारी प्रवास करत होते. त्यामधील ३० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमध्ये कृषी अधिकारी प्रकाश सावंत देसाई हे बचावले होते.

- Advertisement -

देसाईंची नार्को टेस्ट घ्यावी

ऐवढ्या भीषण अपघातामध्ये प्रकाश सावंत देसाई हे एकटेच बचावल्यामुळे सर्व जण आश्चर्यचकित झाले होते. दापोलीतील स्थानिक नागरिक आणि मृतांच्या कुटुंबियांनी प्रकाश सावंत देसाई यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी प्रकाश सावंत यांच्याविरोधात ३० ऑगस्टला कृषी विद्यापीठावर मोर्चा काढून प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली होती. दरम्यान दापोली कृषी विद्यापीठाने आपला चौकशी अहवाल सादर देखील केला होता. या अहवालामध्ये प्रकाश सावंत देसाई यांना क्लीन चिट देण्यात आणली होती.

अखेर देसाई यांची बदली 

प्रकाश सावंत यांनी अपघातानंतर वेगवेगळी विधान केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. पोलीस तपासातून देखील हेच पुढे आले होते. मृतांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा तसंच देसाई यांची नार्को टेस्ट करावी ही मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. तसंच देसाई यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे अशी देखील मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली होती. दापोलीकर आणि मृतांच्या नातेवाईंकाच्या भावना लक्षात घेता प्रकाश सावंत देसाई यांची अखेर रत्नागिरी मत्स्य विद्यापीठात बदली करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -