घरताज्या घडामोडीपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अमित ठाकरेंची होळीनिमित्त हजेरी, चर्चांना उधाण

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अमित ठाकरेंची होळीनिमित्त हजेरी, चर्चांना उधाण

Subscribe

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात गेल्या २ वर्षांमध्ये होळी साजरी करण्यात आली नव्हती. यंदा कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये होळी साणानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. राजकीय नेते मंडळीसुद्धा होळीच्या सणानिमित्त कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मनसे नेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली होती. अमित ठाकरेंच्या हस्ते वरळी कोळीवाड्यात होळी पेटवण्यात आली. मात्र अमित ठाकरे वरळीत दाखल झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे मध्यरात्री कोळीवाड्यात तर पोहचले नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे. मनसेने पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केल आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्यात होळी सणानिमित्त हजेरी लावली होती. कोळीवाड्यात मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. दरवर्षी मुंबईत वरळी कोळीवाड्यात जल्लोषात होळी सण साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाला राजकीय नेते हजेरी लावत असतात. हा मतदारसंघ शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आहे. आदित्य ठाकरे होळी सणानिमित्त हजेरी लावणार होते. तसेच मनसे अमित ठाकरेसुद्धा हजेरी लावणार होते. या कार्यक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अमित ठाकरे यांनी रात्री उशीरा कोळीवाड्यात होळी सणानिमित्त हजेरी लावली.

- Advertisement -

कोळीवाड्यातील नागरिकांनी जल्लोष केला आणि होळीचा सण साजरा केला. मात्र अमित ठाकरेंनी कोळीवाड्यात विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात हजेरी लावली असल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. अमित ठाकरेंच्या उपस्थितीला वेगळ्या नजरेतून पाहिले जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर हजेरी लावली नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणूक जवळ आली असल्यामुळे सगळेच राजकीय नेते आपल्या मतदारसंघात जात आहेत. मतदारसंघातील मतदारांशी जवळीक आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अमित ठाकरे यांनी वरळीत हजेरी लावली असल्यामुळे यामागे नक्की काय कारण आहे? असा प्रश्न जाणकारांना पडला आहे.

मनसेने महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये मनसे सक्रिय झाली आहे. लवकर पालिका निवडणुकींची निवडणूक जाहीर होऊ शकते. यामुळे राजकीय पक्षांकडून मतदार संघात कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तर नेते मंडळी कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Holi Guidelines 2022: होळी, धूलिवंदन साजरी करताना ‘हे’ नियम पाळा, अन्यथा होईल कायदेशीर कारवाई

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -