घरमहाराष्ट्रबाबा रामदेव यांचा हेतू चांगला, पण विधान योग्यपणे मांडता आले नाही -...

बाबा रामदेव यांचा हेतू चांगला, पण विधान योग्यपणे मांडता आले नाही – अमृता फडणवीस

Subscribe

मुंबई : ठाण्यातील एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी महिलांविषयक केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून जोरदार गदारोळ उठला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले होते. त्यावर आता, महिलांच्या स्वातंत्र्यावर बोलण्याचा हेतू त्यांच्या बोलण्यामागे होता, परंतु त्यांना ते योग्यपणे मांडता आले नाही, अशी सारवासारव अमृता फडणवीस यांनी केली आहे.

महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातले नाही तरी छान दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले होते. बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र संतप्त पडसाद उमटले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही बाबा रामदेव यांना नोटीस बजावली आहे. तर, बाबा रामदेव यांच्यावर 354 ड या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांच्याकडे केली.

- Advertisement -

पणजी येथे अमृता फडणवीस यांनी याबाबत सारवासारव केली आहे. महिलांच्या स्वातंत्र्यावर बोलण्याचा त्यांचा हेतू होता, परंतु त्यांना हे विधान योग्यपणे मांडता आले नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीने तसेच अधिक सभ्यपणे आपली भूमिका मांडता आली असती, असे त्या म्हणाल्या. महिलांच्या स्वातंत्र्याबाबत बाबा रामदेव बोलत होते. त्यांनी आपले मुद्दे अतिशय योग्य पद्धतीने मांडले. मात्र केवळ एक वाक्य त्यांना व्यवस्थित मांडता आले नाही आणि नेमक्या याच वाक्यावरून वादंग निर्माण झाले, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

राजकीय नेत्याचे सार्वजनिक जीवन खूपच व्यग्र असते. सक्रिय राजकारणासाठी पुरेसा वेळ लोकांना देणे गरजेचे आहे. पण सध्या, समाजसेवा, मुलीला वेळ देणे, गायन तसेच इतर कामांमुळे मला तितका वेळ देता येत नाही. लोकांसाठी आपण वेळ देऊ शकतो, असे जेव्हा वाटेल तेव्हाच सक्रिय राजकारणात येण्याचा विचार करू, असे फडणवीस म्हणाल्या.

- Advertisement -

बाबा रामदेव यांच्याकडून माफीनामा
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून वेगळा अर्थ काढण्यात आला. तथापि, माझ्या या वक्तव्याने कोणत्याही महिलेचे मन दुखावले असल्यास मी माफी मागतो, असा माफीनामा योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला आहे. राज्य महिला आयोगाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी माफी मागितली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -