घरमहाराष्ट्रभाजपात जाण्याचा प्रश्नच नाही, अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण

भाजपात जाण्याचा प्रश्नच नाही, अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण

Subscribe

मी अडीच वर्षांपूर्वी समझोता केला असता तर मला अटक झाली नसती, असे मी वर्ध्याच्या सभेत म्हणालो होतो. कोणत्याही पक्षात जाण्याचा तसेच येण्याचा प्रश्नच नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांना मी जे बोललो त्याचा संदर्भ माहीत नाही. ज्यांना विषय माहीत आहे, त्यांना बरोबर समजले असेल. बावनकुळेंनी विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी काय घडले हे खुलेआम सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले.

वर्ध्यातील भाषणानंतर अनिल देशमुख यांना तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर होती. या देशमुखांच्या दाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील दुजोरा दिला होता. तुम्ही पक्ष बदला, विचार बदला आणि नेतृत्व बदला, असे देशमुखांना सांगण्यात आले, परंतु त्यांनी पक्षाची साथ न सोडता तुरुंगात जाण्याची तयारी दाखवली, असे शरद पवार म्हणाले होते.

- Advertisement -

अनिल देशमुख खोटे बोलत आहेत. त्यांना भाजपने कोणतीही ऑफर दिली नव्हती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात जे काही घडले, ते मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील. त्यांचे पाय आणखी खोलात जातील.-चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -