घरमहाराष्ट्रशिंदेंच्या खासदार Bhavana Gawali यांच्या अडचणीत वाढ, प्राप्तिकर विभागाने पाठवली दुसरी नोटीस

शिंदेंच्या खासदार Bhavana Gawali यांच्या अडचणीत वाढ, प्राप्तिकर विभागाने पाठवली दुसरी नोटीस

Subscribe

शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. रविवारी प्राप्तकर विभागाकडून नोटीस आल्यानंतर आता पुन्हा एक नोटीस प्राप्तिकर विभागाकडून देण्यात आली आहे.

वाशीम : शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. रविवारी (ता. 07 जानेवारी) गवळी यांना महिला उत्कर्ष प्रतिष्ठानबाबत प्राप्तिकर विभागाडून नोटीस बजावण्यात आली होती. प्राप्तिकर विभागाचे अकोल्याचे सहाय्यक संचालक प्रशांत अरविंद गोरडे यांनी ही नोटीस बजावली होती. त्यानंतर आता पुन्हा खासदार गवळी यांना दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. भावना अॅग्रो प्रॉडक्ट्‌स अँड सर्व्हिसेसला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता गवळी यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकांचे बिगुल हे कधीही वाजण्याची शक्यता आहे आणि त्यातच आता गवळी यांना नोटीस देण्यात येत असल्याने आगामी लोकसभेतील त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Another notice sent by Income Tax Department to MP Bhavana Gawali )

हेही वाचा… ED Raids : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर पुन्हा ईडीच्या रडारवर, घरासह सात ठिकाणी छापेमारी

- Advertisement -

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक आमदार-खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यामध्ये वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचाही समावेश आहे. रविवारी गवळी यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस बजावल्यानंतर त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे खाते गोठवल्याची माहिती समोर आली होती. पण, असे काहीही झाले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पण आता पुन्हा एकदा भावना गवळी यांच्या भावना अॅग्रो प्रॉडक्ट्‌स अँड सर्व्हिसेसला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता पुन्हा एकदा विरोधकांकडून गवळी यांच्यावर निशाणा साधण्यात येणार आहे. तर, या कारवाईनंतर गवळी यांना पुन्हा खासदारकीची उमेदवारी मिळेल का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

प्राप्तिकर विभागाने 29 डिसेंबर रोजी भावना गवळी यांना नोटीस दिली होती. तर 05 तारखेला त्या संदर्भातील अहवाल त्यांना मांडायचा होता. मात्र तो अहवाल सादर करताना त्या प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांनी प्रतिनिधी पाठवून नोटीसला उत्तर दिले होते. मात्र त्यावर प्राप्तिकर विभागाचे समाधान झाले नाही. 8.26 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरण्यासाठी अखेर भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत 24 कोटी रुपयांचा अफरातफर आणि त्यातून सात कोटी रुपये चोरीला गेले आहेत, अशी तक्रार 12 मे 2020 रोजी त्यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिली होती. मात्र या संदर्भातील प्राप्तिकर भरला नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना प्राप्तिकर विभागाने ही नोटीस जारी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -