घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCovid-19 Effect : कोरोनामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम, स्किझोफ्रेनियाचा धोका वाढण्याची शक्यता

Covid-19 Effect : कोरोनामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम, स्किझोफ्रेनियाचा धोका वाढण्याची शक्यता

Subscribe

Covid19 : जगभरात कोरोनाचा नवीन JN.1 हा सब व्हेरियंटचा कहर वाढत आहे. JN.1 या व्हेरयंटमुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत देखील वाढ होत आहे. कोरोना विषाणूमुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होत असल्याचं संशोधनात उघड झालं आहे. त्यामुळे स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढला आहे.

कोरोनाच्या नवीन JN.1 या सब व्हेरियंटमुळे कोरोनाचा गंभीर आजारांचा धोका कमी आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. वाढत्या कोरानाच्या रुग्णांमुळे नवीन व्हेरियंटचा धोका देखील वाढत आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे शरीरातील इतर अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका वाढला आहे. कोरोना विषाणू स्वत: मध्ये सातत्याने बदल करत असून अधिक धोका निर्माण होत आहे. असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Corona : राज्यात आज कोरोनाच्या 154 रुग्णांची नोंद तर दोघांचा मृत्यू; JN 1 व्हेरियंट रुग्णांची संख्या शंभरच्या वर

कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे फुफ्फुस-हृदय आणि मेंदूशी संबंधित विकारांसह श्वसनाच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. मेंदूच्या कार्यासाठी विषाणूचा संसर्ग गंभीर समस्या असू शकतात. अस एका अभ्यासात दिसून आलं आहे. कोरोना व्हायरसमुळे मानवी शरीराव अनेक दुष्परिणाम होतात हे जाणून घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळलं आहे की, मेंदूच्या कार्यासाठी विषाणूचा संसर्ग गंभीर समस्या असू शकतो.

- Advertisement -

संशोधनाच्या अहवालानुसार, कोरोनाच्या संसर्गामुळे लोकांना मध्यम ते गंभीर आजार झाला आहे. त्यांना स्किझोफ्रेनिया स्पेक्ट्रम आणि सायकोटिक डिसऑर्डर यासारखे आजार होण्याचा धोका जास्त असतो. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये स्किझोफ्रेनियाचा धोका जास्त असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या एका नवीन अभ्यासात मेंदूच्या संज्ञानात्मक कार्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल लोकांना सतर्क केलं आहे.

स्किझोफ्रेनियाची सुमारे 20 टक्के प्रकरणे तर 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून आले आहे. कोरोनाच्या संसर्गाचा तरूणांमध्ये धोका जास्त वाढला आहे. संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या लोकांना धोका आहे की नाही. याबाबत अजूनही स्पष्ट माहिती मिळाली नाही. मात्र याकेड दुर्लक्ष न करता, सतर्क राहणे आवश्यक आहे.

हेही वाचा… JN.1 variant : Covid च्या नव्या व्हेरियंटमुळे खळबळ, गेल्या 24 तासांत देशांत कोरोनाच्या 800 पेक्षा अधिक रूग्णांची नोंद

संशोधकांनी सांगितलं आहे की, कोरोनामुळे होणाऱ्या दुष्परिणामध्ये स्किझोफ्रेनियाची ही मोठी समस्या समोर येत आहे. स्किझोफ्रेनिया हा मेंदूचा विकार आहे. या आजारामुळे विचार विकार आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या विचार, भावना आणि वागण्याच्या पद्धतींवर परिणाम होतो. स्किझोफ्रेनिया असलेल्या लोकांना जगाशी संपर्क तुटल्यासारखा भास होतो. आपल्यासोबत जे घडत आहे ते खरे नाही, असे या रुग्णांना वाटतं. त्याचप्रमाणे आपल्या कोणीतरी नियंत्रण ठेवतंय असं देखिल वाटतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -