घरमहाराष्ट्रखाद्य तेलापाठोपाठ आता डाळीच्या दरात घसरण, जाणून घ्या किंमत?

खाद्य तेलापाठोपाठ आता डाळीच्या दरात घसरण, जाणून घ्या किंमत?

Subscribe

पेट्रोल- डिझेलनंतर आता केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या दरात घट केली आहे. यानंतर केंद्राने आता गगणाला भिडणाऱ्या तुरीच्या दरातही घट करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात तुरीच्या डाळीचे दर ९५ रुपयांवरून १०० रुपयांवर पोहचले होते. आता या दरात घट झाली असून सध्या तुरीचे प्रति किलो दर ७२ ते ७५ रुपये किलो झाला आहे. यामुळे तुरीच्या डाळीच्या दरात आता २० ते ३० रुपयांची घट झाली आहे. ही बाब सर्वसामान्यांसाठी दिलासाजनक आहे. विशेषत: महाराष्ट्रात तुराच्या डाळीच्या दरात सर्वात मोठी घसरण झाली आहे. यामागचे कारण म्हणजे महाराष्ट्रातून या डाळीची आवाक इतर बाजार समित्यांमध्ये जास्त आहे.

याशिवाय प्रयागराज येथील मुथिगंज बाजार समितीमध्ये महाराष्ट्रातून डाळीची सर्वाधिक आवाक होतेय. परिणामी डाळीचे दर घसरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तुरीच्या आणि इतर डाळ्यांच्या दरात सतत वाढ होत होती. मात्र आता दर कमी होत असल्याने सर्वसामान्यांच्या आहारातील डाळीची गोडी अधिकचं वाढणार आहे.

- Advertisement -

घाऊक बाजारात तुरीची डाळ किलोमागे १२ रुपयांनी स्वस्त झाल्य़ाने किरकोळ विक्रीतही दर कमी होतील असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होतेय. य घटत्या दराचा फायदा आता ग्राहकांना होणार आहे. विशेषत: डाळीच्या वाढत्या किंमतींमुळे गृहिणींचे कोलमडलेले गणित पुर्वपदावर येणार आहे.

‘या’ राज्यात कमी झाले दर

महाराष्ट्रातून डाळींची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरात घट झाली आहे. यामुळे तुरीची डाळ सध्य़ा किरकोळ बाजारात ९० ते ९५ रुपये किलो दराने विकली जातेय. तसेच ही किंमत आणखी कमी होईल असे म्हटले जातेय. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात डाळींच्या पिकाच्या उत्पादनामुळे आवक वाढली असून, दरात मोठी घट झाल्याचेही तेलबिया व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

काय आहेत नवे दर?

परिणामी बरेलीतील घाऊक बाजारात मोहरीच्या तेलाचे दर हे १६८ रुपये प्रति लिटरने विकले जातेय. तर किरकोळ बाजारात १७५ ते १८० रुपये लिटरप्रमाणे विकले जातेय. तर उत्तर प्रदेशात मोहरीचे तेल प्रति लीटर ५ ते १० रुपयांनी घटले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -