घरमहाराष्ट्रआर्यन खान प्रकरण खोटे, माझ्या वडिलांचं म्हणणं अखेर बरोबर, निलोफर मलिक खान...

आर्यन खान प्रकरण खोटे, माझ्या वडिलांचं म्हणणं अखेर बरोबर, निलोफर मलिक खान यांचं विधान

Subscribe

आता नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांनी भाजपवर निशाणा साधलाय. एनसीबीच्या स्वत:च्या एसआयटीला आर्यन खानविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्याच्याकडे ड्रग्ज नव्हते, तसेच तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय सिंडीकेटचा भाग असल्याचं उघड झालेलं नाही.

मुंबईः शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले नसल्याचे आता स्पष्ट झालेय. त्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी कोणताही संबंध नव्हता. तसेच तो अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांच्या नेटवर्कचा किंवा कटाचा भाग नव्हता. आर्यन खानवर झालेल्या कारवाईच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुंबई एनसीबीने विशेष तपास पथक स्थापन केले होते. याच एसआयटी टीमच्या महत्त्वाच्या अहवालात ही बाब समोर आलीय.

त्यावरूनच आता नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांनी भाजपवर निशाणा साधलाय. एनसीबीच्या स्वत:च्या एसआयटीला आर्यन खानविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्याच्याकडे ड्रग्ज नव्हते, तसेच तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय सिंडीकेटचा भाग असल्याचं उघड झालेलं नाही. माझ्या वडिलांचे नेमके हेच म्हणणे होते. नवाब मलिक हे पहिल्या दिवसापासून सांगत होते, हे खोटे प्रकरण होते आणि आज ते बरोबर सिद्ध झालेत, असंही निलोफर मलिक खान यांनी ट्विट करत सांगितलेय.

- Advertisement -


एसआयटीच्या चौकशीमध्ये मोठा खुलासा

आर्यन खानकडे कधीच ड्रग्ज नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट तपासण्याची गरज नव्हती. आर्यन खान कोणत्याही आंतरराष्ट्रीय सिंडीकेटचा भाग आहे, असं चॅटमध्ये काहीही नाही NCB ने छाप्यादरम्यान व्हिडीओ रेकॉर्ड केलेला नव्हता आणि गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले गेलेत. NCB ने क्रूझवरुन 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रोन, 21 ग्रॅम गांजा, MDMA च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रोख जप्त केले. आर्यन खानने त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितले नाही, असेही तपासामध्ये स्पष्ट झाले. आर्यन खानने मोबाईलमध्ये गांजा आणि ड्रग्जसंबंधी चॅट केले असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु त्याने असे चॅट केलेले नाहीत.


हेही वाचाः आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCBची खंडणीखोरी उघड, भाजपने जाहीर माफी मागावी- सचिन सावंत

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -