घरमहाराष्ट्रआशिष शेलार मुख्य प्रतोद, देवयानी फरांदे प्रतोद

आशिष शेलार मुख्य प्रतोद, देवयानी फरांदे प्रतोद

Subscribe

भाजप विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत आशिष शेलार यांची विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. आशिष शेलार यांच्या व्यतिरिक्त देवयानी फरांदे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात भाजपचे सरकार असतानादेखील शेलार यांच्याकडे महत्वाच्या जबाबदार्‍या देण्यात आल्या होत्या. पक्षाचा मुंबईतील प्रमुख चेहरा ही त्यांची ओळख आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्याकडेच मुख्य जबाबदारी होती. राज्यातील सत्ता गेल्यानंतरही विधी मंडळ कामकाजात शेलार यांच्याकडे मुख्य प्रतोदच्या निमित्ताने महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून सुजीतसिंह ठाकुर यांच्याकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तशी घोषणा होण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. फडणवीस, शेलार, ठाकूर यांच्या रूपाने पक्ष तरूण आणि सक्षम अशा नव्या फळीकडे पक्षाची संपूर्ण धुरा सोपवताना भाजप दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -