घरमहाराष्ट्रकबरीचं सुशोभीकरण होताना पेंग्विन सेनेची पिलावळ काय करत होती? शेलारांचा ठाकरेंना सवाल

कबरीचं सुशोभीकरण होताना पेंग्विन सेनेची पिलावळ काय करत होती? शेलारांचा ठाकरेंना सवाल

Subscribe

पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते, असा असा खोचक टोलाही शेलारांनी लगावला. 

मुंबई – मुंबईत १९९३ साली साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी झालेल्या याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. यावरून भाजपाने महाविकास आघाडी आणि मुख्यत्वे उद्धव ठाकरेंवर रोख ठेवला आहे. ‘दफनभूमीवर सुशोभीकरण करणं महापालिकेचं काम असतं. खासगी दफनभूमी असेल तर पालिकेची परवानगी घ्यावी लागते. मग याकूब मेमनच्या कबरेचं सुशोभीकरण सुरू होतं तेव्हा पेंग्विन सेनेची पिलावळ काय करत होती?’ असा रोकडा सवाल भाजप मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण : भाजपाची मविआवर टीका, शिवसेना व काँग्रेसकडून पलटवार

- Advertisement -

आशीष शेलार म्हणाले की, ‘दफनभूमीवर सुशोभीकरण करायचं असेल ते महापालिकेचं काम असतं. खासगी दफनभूमी असेल तर पालिकेची परवानगी घ्यावी लागते. मग याकूब मेमनच्या कबरेचं सुशोभीकरण सुरू होतं तेव्हा पेंग्विन सेनेची पिलावळ काय करत होती? ज्या दहशवाद्याने मुंबईतील लोकांना मारले, मराठी लोकांची हत्या केली, त्याच्याच कबरीचं सुशोभीकरण केलं गेलं. त्यामुळे याप्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.’

हेही वाचा – अखेर अमरावतीच्या लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी पोलिसांच्या ताब्यात; गुढ कायम

- Advertisement -

पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते, असा असा खोचक टोलाही शेलारांनी लगावला.

यावेळी त्यांनी काँग्रेसवरही घणाघात केला. स्मृतीभ्रंशाचा आजार काँग्रेसला झालाय. याकूब मेमनला जिवंत ठेवलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेसने मांडली होती. ही भूमिका का मांडली याचं उत्तर काँग्रेसने द्यायला पाहिजे, असं आशिष शेलार म्हणाले.

अलिखित समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करा

याकूब मेननची कबर सुशोभित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकराने मदत केली. शिवसेनेने नेहमीच कॉम्प्रमाईज केलं. महाविकास आघाडी सरकार चालवण्याकरता आणि मुख्यमंत्रीपद टीकवण्याकरता ठाकरेंनी कॉम्प्रमाईज करावं लागलं हे या घटनेने स्पष्ट होतंय. मविआने केलेल्या या कृतीचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र कलंकित झाला. महाराष्ट्राची प्रतिमा खाली गेली, याला जे जबाबदार आहेत, ज्यांनी समर्थन केले त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावे अशी मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही करणार आहोत. आरोपी तत्काळ पकडून त्यांच्यावर कारवाई करावी. देशद्रोहासारखं हे कृत्य आहे. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावेत. ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहोत, असं सांगितलं. आम्ही हिंदुत्व बाजूला सारणार नाही असं सांगितलं. बाळासाहेबांचे विचार मातीत मिसळणार नाही. मात्र, त्यांनी कॉम्प्रोमाईज का केली, जनतेला याचं उत्तर दिलं पाहिजे. अलिखित समर्थन करणाऱ्यांवर कारवाई केली, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -