घरताज्या घडामोडीअखेर अमरावतीच्या लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी पोलिसांच्या ताब्यात; गुढ कायम

अखेर अमरावतीच्या लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी पोलिसांच्या ताब्यात; गुढ कायम

Subscribe

अमरावतीमध्ये लव्ह जिहाद प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. एका मुलीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलेच तापले होते. मात्र आता या लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमरावतीमध्ये लव्ह जिहाद प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. एका मुलीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलेच तापले होते. मात्र आता या लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही तरुणी साताऱ्यात सापडली असून, लोहमार्ग पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले आहे. लवकरच या तरुणीला अमरावतीत आणले जाणार आहे. (Amravati love jihad case girl found pune railway police arrested)

संबंधीत तरुणी ही निजामुद्दीन ते वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यावेळी ही ट्रेन सातारा स्थानकावर येताच पोलिसांनी स्टेशन मास्तरांना फोन करून गाडी स्टेशनवरच थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास या मुलीला ताब्यात घेतले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलिसांनी या रेल्वेच्या 22 डब्यांची तपासणी केली. त्यातील एस 6 एस 7 या डब्यामध्ये ही मुलगी एकटी प्रवास करताना आढळून आली. दरम्यान, अमरावती पोलीस ठाण्यात ही तरुणी मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या मुलीचे लोकेशन पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत असल्याने तिचा शोध व्हावा, अशी विनंती लोहमार्ग पोलिसांना करण्यात आली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या मुलीचा फोटो पाठवून शोध सुरू केला.

अमरावती जिल्ह्यातील 19 वर्षे तरुणी 2 दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर तिच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीवरून ती सोहेल शहा नावाच्या युवकाच्या संपर्कात होती. मुलगी बेपत्ता झाल्याचे कळतच कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि सोहेल शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतले, या मुलीचा तातडीने शोध घ्यावा यासाठी भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धरणे आंदोलन सुद्धा केले.

- Advertisement -

साताऱ्यातून तिला आणण्यासाठी अमरावतीचे पोलीस पथक रवाना झालेल आहे या मुलीला उद्या किंवा परवा अमरावतीत आणले जाणार असल्याची माहिती मिळते. याबाबतचा तपशील उघड न झाल्याने गुढ कायम आहे.


हेही वाचा – मुसळधार पावसामुळे राज्यातील 14 जिल्ह्यांत यलो अलर्ट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -