घरमहाराष्ट्रAshok Chavan : पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण गडबडले; भाजपा ऐवजी काँग्रेसचा...

Ashok Chavan : पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण गडबडले; भाजपा ऐवजी काँग्रेसचा उल्लेख

Subscribe

अशोक चव्हाण यांच्या भाजपामधील पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबोधनानंतर अशोक चव्हाणांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे असं म्हणताच मध्येच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची ती चूक दुरुस्त केली.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना अशोक चव्हाण मात्र गडबडले. त्यांनी मुंबई भाजपचे म्हणण्याएवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असे म्हणात उपस्थितांमधअये हशा पिकला. यावेळी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सावरण्याच प्रयत्न केला. (Ashok Chavan Ashok Chavan messed up in the very first press conference They said Congress instead of BJP)

अशोक चव्हाण यांच्या भाजपामधील पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबोधनानंतर अशोक चव्हाणांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे असं म्हणताच मध्येच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची ती चूक दुरुस्त केली. मुंबई काँग्रेसचे नाही तर भाजपचे म्हणा असं म्हणतच पन्नास वर्षाची सवय आहे असं म्हणत त्यांनी अशोक चव्हाणांना सांभाळून घेतलं. त्यानंतर अशोक चव्हाणांनी बोलायला सुरुवात केली. पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे असं होतेय. पहिली पत्रकार परिषद भाजपाच्या कार्यालयामध्ये माझी होत आहे. तेवढं थोडंस आम्हाला सांभाळून घ्या, आज पहिलाच दिवस आहे. कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम इकडं येणं म्हणजे, म्हणून थोडसं समजून घ्या अशीही विनंती अशोक चव्हाण यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा :Farmer Protest: पंजाब-हरियाणा बॉर्डरवर शेतकऱ्यांवर पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा; ‘बळाचा वापर हा शेवटचा उपाय’, उच्च न्यायालयाने फटकारले

काय म्हणाले अशोक चव्हाण?

भाजपाची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेन. पक्ष जो आदेश देईल, फडणवीस जे सांगतील ते काम करणार आहे. मी कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही. मला जे काही सांगितलं जाईल, ते मी प्रामाणिकपणे करणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. तसंच, मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी मला अनेकदा सहकार्य केलं आहे. भाजपात येण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक आहे, असं ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Uddhav Thackeray : मला नाही अब्रू मी कशाला घाबरु; ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लोबाल

चेन्नीथला यांनी घेतला चव्हाणांचा समाचार

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज काँग्रेसमधील नेत्यांच्या भेटी घेतल्या. राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील कोणताच नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता जाणार नाही. अशोक चव्हाणांनी सांगायला हवं की त्यांच्यावर ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे का? त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने अन्याय केला का? हे त्यांनी सांगालया हवं. आज मी त्यांनी पत्रकार परिषद बघितली त्यामध्ये त्यांनी पक्ष सोडण्याचं कुठलंच कारण सांगितलं नाही. तेव्हा त्यांच्या जाण्याने काँग्रेसला कुठलाच फरक पडणार नाही. असेही यावेळी चेन्नीथला म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -