घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरइच्छूकांनो लागा कामाला; पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याची शक्यता

इच्छूकांनो लागा कामाला; पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याची शक्यता

Subscribe

नाशिक : मागील तब्बल दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याला राज्य निवडणूक आयोगाचे एक परिपत्रक कारण ठरतंय

खरंतर फेब्रुवारी मार्च 2022 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, ओबीसी आरक्षण तसेच प्रभाग रचना या दोन कारणामुळे कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झाला आणि या निवडणुका या कायदेशीर बाबीत अटकून होऊ शकल्या नव्हत्या.

- Advertisement -

आता, निवडणूक आयोगाने परिपत्रकाच्या माध्यमातून एक अधिसूचना जारी केली आहे त्यानुसार 1 जुलै 2023 रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर – ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने मतदार याद्या अंतिम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे राज्य निवडणूक आयोग पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या मानसिकतेत असल्याचं आणि त्या दृष्टिकोनातून तयारी करत असल्याचं दिसून आले आहे.

5 जुलै 2023 रोजी राज्य निवडणूक आयोगाने हे परिपत्रक काढले असून हे परिपत्रक संबंधित प्रशासनाला पाठवण्यात आले आहे. हे परिपत्रक सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. तसेच, महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात होतील अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

फडणवीसांचा दुजोरा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्रकार परिषदे दरम्यान पत्रकारांनी स्थानिक स्वराज्य निवडणूक आमच्या बाबत प्रश्न विचारला असता ‘या निवडणुका आमच्यामुळे नव्हे तर ठाकरे गटातील लोकांनी न्यायालयात केलेल्या विविध याचिकेमुळे थांबल्या आहेत. मात्र, आता या सर्व याचिकांवर सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे वक्तव्य केले होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याला दुजोरा दिला होता. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने हे परिपत्रक काढल्यामुळे पावसाळ्यानंतर निवडणुका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -