आम्हाला वजन वाढवण्यासाठी पैसे मिळाले… ‘डबल एक्सएल’च्या प्रमोशन दरम्यान सोनाक्षीने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री हुमा कुरैशी यांचा आगामी ‘डबल एक्सएल’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपट येत्या 4 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. याचं निमित्ताने ‘डबल एक्सएल’ची संपूर्ण टीम कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा’शो मध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी या चित्रपटातील अनेक गमतीशीर किस्से देखील सांगितले.

तसेच सध्या या चित्रपटासाठी सोनाक्षी आणि हुमा कुरैशीने वजन वाढवलं आहे. ज्यामुळे अनेकजण त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करु लागले आहेत. मात्र याबाबत सोनाक्षीने सांगितलं की, “तिला आणि हुमा कुरैशीला जास्त खाऊन वजन वाढवण्यासाठी पैसै दिले गेले आहेत.” तर हुमा कुरैशीने सांगितलं की, “तिने या चित्रपटासाठी 20 किलो वजन वाढवलं आहे. तर सोनाक्षीने 15 किलो वजन वाढवलं आहे.”

तसेच चित्रपटाच्या सेटवरील गमतीदार किस्से सांगताना हुमाने सांगितलं की, “जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते, त्यावेळी कोरोनाचे नियम पाळायचे होते आणि 14 दिवल आयसोलेट व्हायला लागायचं. त्यावेळी क्वारंटाइनमुळे 14 दिवस एकत्र असल्यामुळे आमच्यामध्ये एक चांगला बॉन्ड तयार झाला. आम्ही एका ग्रुपप्रमाणे सगळे काम एकत्र करायचो. खूप मजामस्ती करायचो.”

‘डबल एक्सएल’ची काय आहे कथा
‘डबल एक्सएल’ चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत असणार आहेत. जेव्हा या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला होता. तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा होत आहे. अनेक प्रेक्षक या चित्रपटची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची गोष्ट जाड, वजनदार महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट बॉडी शेमिंगला सडेतोड उत्तर देताना दिसून येईल. चित्रपटामध्ये वजनला विनोदी अंदाजात दाखवण्यात आलं आहे.

सतराम रमानी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘डबल एक्सएल’मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी व्यतिरिक्त जहीर इकबाल आणि महत राघवेन्द्र देखील दिसून येतील. तसेच ‘डबल एक्सएल’चे निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, साकिब सलीम, हुमा कुरैशी हे करत आहेत.


हेही वाचा :

‘डबल एक्सएल’ चित्रपटातून भारतीय क्रिकेटर शिखर धवनचं बॉलिवूड पदार्पण