घरमहाराष्ट्रभारत बहुरंगी होता, राहिल, तो केवळ भगवा, हिरवा असणार नाही; विक्रम गोखलेंना...

भारत बहुरंगी होता, राहिल, तो केवळ भगवा, हिरवा असणार नाही; विक्रम गोखलेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

Subscribe

देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्ये विक्रम गोखले यांनी केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्ये विक्रम गोखले यांनी केलं. या वक्तव्याला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारत हा देश बहुरंगी होता. तो कधीही नुसता भगवा किंवा हिरवा राहणार नाही, असं प्रत्युत्तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिलं.

विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विक्रम गोखले यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्य केलं. याला अतुल लोंढे यांनी ट्विट करत जोरदार उत्तर दिलं. “विक्रम गोखले जी भारत हा बहुरंगी होता, आहे आणि राहिल. तो कधीही नुसता भगवा किंवा हिरवा असणार नाही,” असं ट्वीट करत लोंढे यांनी प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -

काय म्हणाले विक्रम गोखले?

लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही २ ऑक्टोबरला येते, ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे, असं विक्रम गोखले म्हणाले.

- Advertisement -

तसंच, जे ७० वर्षात झालं नाही ते पंतप्रधान मोदींनी केलं, पक्षाचं काम सर्व करतात, पण देशासाठी मोदी चांगलं काम करतात, असं कौतुक विक्रम गोखले यांनी मोदींचं केलं.


हेही वाचा – होय, भारताला स्वातंत्र्य भीक मागून मिळालंय’; विक्रम गोखलेंचं कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याला समर्थन

शिवसेना-भाजपने एकत्र यायलाच हवं, मध्यस्थीसाठी मी तयार – विक्रम गोखले


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -