घरमहाराष्ट्रशासन निर्णयात औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्‍लेख; राजकारण तापण्याची शक्यता

शासन निर्णयात औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्‍लेख; राजकारण तापण्याची शक्यता

Subscribe

जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेवर विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत राज्याच्या उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात औरंगाबादचा सोबतच संभाजीनगर असाह उल्लेख करण्यात आल्याने यावरून पुन्हा राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

वराज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले असून राज्यात परकीय आणि देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषद स्थापन करण्यात आली आहे. या परिषदेवर राज्यातील औद्यगिक संघटनांचे प्रमुख तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्यांचे गुंतवणूक सल्लागार आणि व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार

- Advertisement -

या परिषदेवर साँलिसिटर नितीन पोदार, मराठा चेंबर आँफ काँमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने, स्टर्लिंग अँड विल्सन प्रा. लिचे सीईओ प्रसन्न सरंबळे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी आणि अप्लाईड इनोवेशन अँड टेक्नाँलाँजी ग्रुपचेचेअरमन रामचंद्र भोगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयात रामचंद्र भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर-औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून आता राजकारण रंगू लागले आहे.भाजप आमदार आशीष शेलार यांनी औरंगाबाद नामांतराचा निर्णय केवळ जीआरपुरताच मर्यादित राहू नये तर लवकरच त्‍याची घोषणा करावी, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

दरम्‍यान,विधिमंडळाच्या अधिवेशनातही भाजप आमदार योगेश सागर यांनी याबाबतचा लेखी प्रश्न विचारला होता. त्‍यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्‍या लेखी उत्तरात औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याबाबत राज्याच्या विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात येत आहे. या विभागाचा अभिप्राय तसेच इतर आवश्यक मान्यता प्राप्त होताच नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारला रितसर पाठवण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -