घरक्रीडाT20 World Cup 2021 : आफ्रिकेचा सुपरमॅन! हवेत उडी मारत घेतला स्मिथचा...

T20 World Cup 2021 : आफ्रिकेचा सुपरमॅन! हवेत उडी मारत घेतला स्मिथचा झेल, पाहा व्हिडिओ

Subscribe

टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ५ गडी राखून पराभव केला. मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांची फलंदाजी आणि गोलंदाजांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. हा सामना जरी आफ्रिका संघाने हरला असला तरी आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करमने उडी मारुन घेतलेल्या झेलची आता जोरदार चर्चा सुरु आहे. सामन्यादरम्यान एडन मार्करामने शानदार झेल घेऊन चाहत्यांची मने जिंकली. स्टीव्ह स्मिथ फॉर्ममध्ये दिसत होता. याच स्मिथचा उडी मारुन झेल घेत त्याला तंबुत पाठवलं.

एनरिक नॉर्खियाच्या गोलंदाजीवर स्मिथने मिड विकेटच्या दिशेने पुल शॉट मारला. मिड विकेटला खरंतर कोणीही फिल्डर नव्हता. लाँग ऑन क्षेत्ररक्षण करत असलेल्या मार्करमने सुपरमॅन बनत हवेत उडत अशक्य असा झेल घेतला. झेल खूप अवघड होता. पण मार्करमने अवघड झेल सोपा केला. हा झेल पाहून समालोचकही अवाक् झाले. त्याच्या कमाल क्षेत्ररक्षणामुळे स्मिथ तंबुत परतला. ३४ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर ५ गडी राखून विजय

टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ५ गडी आणि २ चेंडू राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११९ धावांचे आव्हान दिले होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -