घरमहाराष्ट्रAwhad VS Ajit Pawar : लढणारा माणूस कधीच भावनिक होत नसतो, तो...;...

Awhad VS Ajit Pawar : लढणारा माणूस कधीच भावनिक होत नसतो, तो…; आव्हाडांचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती दौरा केला. यावेळी त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, काही लोकं थोडं भावनिक करण्याचं प्रयत्न करतील. अजित पवार यांच्या याच वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे.  (Awhad VS Ajit Pawar A fighting man never gets emotional he will fight and win even at the age of 84 Attack by Jitendra Awhad)

हेही वाचा – Ajit Pawar : भावनिक होऊन काम होत नाहीत; पक्ष मिळाल्यावर अजितदादांची बारामतीकरांना साद

- Advertisement -

बारामतीत कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, काही लोकं थोडं भावनिक करण्याचं प्रयत्न करतील, पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. अजित पवार यांच्या या वक्त्वयावर बोलताना जितेंद्र आव्हाज म्हणाले की, अजित पवार दरवेळेस बारामतीत जाऊन काहीतरी भावनिक होतील वगैरे बोलतात, पण काही भावनिक वगैरे कोणी होणार नाही. लढणारा माणूस कधीच भावनिक होत नसतो. तो (शरद पवार) वयाच्या 84 व्या वर्षीही लढेल आणि जिंकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Jarange VS Bhujbal : छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावर जरांगेंनी एकेरी उल्लेख करत म्हटलं…

- Advertisement -

अजित पवार काय म्हणाले?

बारामतीत कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांना भावनिक साद घालताना दिसले, तसेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांना सावध करताना दिसले. अजित पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदासाठी हपापलेला नाही आहे आणि मी पक्षही चोरलेला नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला दाव्याने सांगेने की, तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे, तुमची एकजूट आहे, तोपर्यंत माझं काम अशाचप्रकारे सुरू राहिल, तुम्ही काळजी करू नका. काही लोकं थोडं भावनिक करण्याचं प्रयत्न करतील, पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक होऊन काम होत नाहीत. काम तडफेनेच करावी लागतात, जोरकसपणे करावी लागतात. ही गोष्ट आपण सगळेजण लक्षात घ्या, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -