घरमहाराष्ट्रपाच्छापूर मार्गाची दुरवस्था

पाच्छापूर मार्गाची दुरवस्था

Subscribe

 पाच्छापूर गावाकडे जाणारा मार्ग अतिशय बिकट झाला असल्यामुळे तेथून जाणार्‍या ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा मार्ग लवकर दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.पाच्छापूर फाटा ते गाव हा मार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. या मार्गावर गौळमाळ, असाणेवाडी, दर्यागाव ही गावे व आदिवासी वाड्या आणि धनगरवाडी आहे. पाच्छापूरमध्ये माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळांतून गाव व आदिवासी वाड्यांसाह शरदवाडी आदिवासी वाडीतील अनेक मुले शिक्षणासाठी येतात. तसेच गावाला लागून ऐतिहासिक महत्त्व असलेला सुधागड किल्ला देखील आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. तसेच नवरात्रात नऊ दिवस किल्ल्यावर खूप गर्दी असते. येथील श्री भोराई देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक गर्दी करतात. मात्र पाच्छापूरपर्यंत जाणारा रस्ता ठिकठिकाणी फुटला असून, खड्डे पडले आहेत. शरदवाडी जवळील रस्ता तर पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे खूपच अवघड होते.

- Advertisement -

खराब रस्त्यामुळे पाच्छापूर गावाकडे येणारी एसटी बस बंद पडण्याची भीती येथील ग्रामस्थ व शिक्षकांना वाटत आहे. जर बस सेवा बंद झाली तर गावकर्‍यांचे दळणवळण बंद होईलच, शिवाय विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार आहे.

नादुरुस्त रस्त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे खूप हाल होतात. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त होणे खूप गरजेचे आहे. केवळ तात्पुरती डागडुजी न करता चांगल्या स्वरुपाचे काम केले पाहिजे.
-भाऊ कोकरे, सरपंच, अडुळसे ग्रुप ग्रामपंचायत

- Advertisement -

सुधागड किल्ल्याकडे जाणार हा महत्त्वाचा मार्ग आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांसह किल्ल्यावर येणार्‍या पर्यटकांना देखील त्रास होतो. तसेच नवरात्रीनिमित्त किल्ल्यावर श्री भोराई देवीची उत्सव असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हजारो भाविक येत असतात. पर्यटनाच्यादृष्टीने हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे.
-प्रकाश पालकर, कार्याध्यक्ष, सुधागड वंचित सामाजिक विकास संस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -