घरताज्या घडामोडी'भारत बंद' : दुकान बंद करायला आले आणि...

‘भारत बंद’ : दुकान बंद करायला आले आणि…

Subscribe

बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला यवतमाळ येथे हिंसक वळण लागले.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याविरोधात आंदोलन करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेने आज २९ जानेवारी रोजी भारत बंदची हाक दिली होती. दरम्यान, भारत बंदला यवतमाळ येथे हिंसक वळण लागले. यवतमाळच्या स्थानिक अग्रसेन चौकात व्यापारी आणि आंदोलकांमध्ये दुकान बंद करण्यावरुन चांगलाच वाद झाला. नागरिकत्व कायद्याला विरोध करण्याकरिता आंदोलकांनी यवतमाळमधील अग्रसेन चौकातील दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, दुकानदारांनी दुकाने बंद करण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलक दुकानात घुसले आणि त्यांनी दुकानामधील सामानाची नासधूस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुकानदारांनी आंदोलकांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आंदोवकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आंदोलक देखील सैरभैर झाले आणि तिथून आंदोलकांनी पळ काढला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात एकच गदारोळ झाला होता. दरम्यान, आंदोलकांना पळवून लावण्यास पोलिसांना यश आले. मात्र, अजूनही यवतमाळमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बहुजन क्रांती मोर्चाचा भारत बंद, रेलरोकोमुळे मुंबईकर वेठीला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -