घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र केसरी यावेळी नवा पैलवान मिळणार; बाला रफिक शेख, कटके पराभूत

महाराष्ट्र केसरी यावेळी नवा पैलवान मिळणार; बाला रफिक शेख, कटके पराभूत

Subscribe

गतविजेत्या बाला रफिक शेखला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती विभागात सोमवारी पराभवाचा सामना करावा लागला. बाला रफिक शेखला यंदाही ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. परंतु, सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने त्याला उपांत्य फेरीच्या लढतीत पराभवाचा धक्का दिला. अवघ्या सव्वा मिनिटांत ज्ञानेश्वरने बाला रफिक शेखला चितपट करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. या लढतीत बालाने पहिल्या मिनिटाला २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर त्याचा खेळ खालावला. बालाला पराभूत करणारा ज्ञानेश्वर जमदाडे मूळचा सोलापूरचा असून कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करतो.

दुसरीकडे मागील वर्षीच्या उपविजेत्या अभिजित कटकेचाही पराभव झाला आहे. त्याला गादी (मॅट) विभागात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पराभूत केले. कटकेने हा सामना २-५ असा गमावला. त्यामुळे त्याचे सलग चौथ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या किताब पटकविण्याचे स्वप्न भंगले. कटकेवर मात करणारा हर्षवर्धन सदगीर पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो.

- Advertisement -

मागील वर्षीचे विजेते आणि उपविजेते मल्ल पराभूत झाल्याने यंदा महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा नवा मल्ल उचलणार हे निश्चित झाले आहे. माती आणि गादी विभागातील विजेत्या मल्लामध्ये महाराष्ट्र केसरी किताबाची लढत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -