घरताज्या घडामोडीकेडीएमसीत भाजप शिवसेनेला देणार आणखी एक धक्का

केडीएमसीत भाजप शिवसेनेला देणार आणखी एक धक्का

Subscribe

स्थायी समितीनंतर आता परिवहन सभापतीवर भाजपचा डोळा आहे. त्यामुळे केडीएमसीत शिवसेनेला दुसरा धक्का लागला जाऊ शकतो.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपद पटकावल्यानंतर आता परिवहन समितीचे सभापतीपदावर भाजपचा डोळा आहे. परिवहन समितीत शिवसेना भाजपचे समसमान सदस्य संख्या आहे. मात्र स्थायीचे सभापतीपद भाजपकडे गेल्याने परिवहनचा विजय सोपा झाला आहे. त्यामुळे स्थायी समितीनंतर आता परिवहन समितीही शिवसेनेच्या हातून निसटणार आहे. महापालिकेच्या परिवहन समितीवर शिवसेनेचा सभापती आहे. सध्या परिवहन समितीत शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. स्थायी समितीचे सभापती हे परिवहनचे पदसिध्द सदस्य असतात. मात्र स्थायी समिती सभापतीपदी भाजपने विजय मिळवल्याने परिवहन समितीत भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपची सदस्य संख्या एक ने वाढली आहे.

शिवसेनेला हा दुसरा धक्का मानला जाऊ शकतो

मार्च महिन्यात परिवहन सभापतीपदाची निवडणूक होत असते. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे मागील वर्षी मार्चमध्ये होणारी निवडणूक जून मध्ये पार पडली होती. त्यावेळी परिवहन समितीवर शिवसेनेचे वर्चस्व असल्याने सेनेचे मनोज चौधरी हे बिनविरोध निवडून आले होते. आचारसंहितेमुळे चौधरी यांना नऊ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. तसेच पालिकेची सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार असल्याने नव्या सभापतीला केवळ सहा किंवा सात महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. मात्र स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीमुळे परिवहन समितीमधील राजकीय गणित बदलली आहेत. त्यामुळे परिवहन समितीवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाल्याने भाजपचा सभापती विराजमान होणार आहे. म्हणून शिवसेनेला हा दुसरा धक्का मानला जाऊ शकतो.

- Advertisement -

काँग्रेस नगरसेविकेवर कारवाई?

स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सदस्या हर्षदा भोईर यांनी भाजपला मतदान केल्याने खळबळ उडाली आहे. पक्ष शिस्तीचा आदेश डावलल्याप्रकरणी भोईर यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. कल्याण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी याप्रकरणी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. मात्र महापालिकेत काँग्रेसचे केवळ चारच नगरसेवक आहेत. काँग्रेसचे गटनेता नंदू म्हात्रे यांनीही सतर्कता बाळगली नाही. त्यामुळे त्यांनाही पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असेही पक्षाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – सावधान! डोंबिवलीत आढळली प्लॅस्टिकची अंडी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -