घरमहाराष्ट्रबारसू रिफायनरी प्रकरण : होय, 'ते' पत्र ठाकरेंचंच; संजय राऊतांची कबुली

बारसू रिफायनरी प्रकरण : होय, ‘ते’ पत्र ठाकरेंचंच; संजय राऊतांची कबुली

Subscribe

. विरोधकांनी केलेल्या विरोधानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी प्रकल्पासाठी ही जागा उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना सुचवल्याचं म्हटलं. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज्यात बारसू येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. तसचं, बारसूमधील नागरिक देखील या प्रकल्पाला विरोध करत आहेत. विरोधकांनी केलेल्या विरोधानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी प्रकल्पासाठी ही जागा उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना सुचवल्याचं म्हटलं. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ( Barsu Refinery Case Thackeray group leader Sanjay Raut admit that letter wrote by Uddhav Thackeray )

नाणार आणि बारसू या दोन्ही जागांसंदर्भातल्या भूमिका स्पष्ट होत्या. नाणारला विरोध झाल्यानंतर बारसू ही पर्यायी जागा होऊ शकते, असं उद्धव ठाकरे यांनी सुचवलं होतं. परंतु जर आता त्या जागेवर प्रकल्प उभारायला लोकांचा विरोध असेल तर मात्र ठाकरे गट लोकांच्या बाजूने उभा आहे, ही आमची राजकीय भूमिका असल्याचे म्हणत राऊत यांनी ते पत्र ठाकरे यांनीच लिहिल्याचं कबूल केलं आहे.

- Advertisement -

उद्योगमंत्र्यांनी आधी याचं उत्तर द्यावं

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारी कागद फडकवत ठाकरेंनीच जागा सुचवल्याचं म्हणण्यापेक्षा महत्त्वाचे प्रक्लप महाराष्ट्राबाहेर का गेले ते आधी सांगावं. टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर का गेला ते आधी सांगावं. फाॅक्सकाॅन वेदांत का बाहेर गेला? रायगडमधला ड्रग्ज पार्क का बाहेर गेला? यावर उद्योगमत्र्यांनी आपलं तोंड उघडावं, असं म्हणत राऊतांनी उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपाऱ्या देऊन बारसुला विरोध होत असल्याचं म्हटलं, त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुपाऱ्या घेऊन बोलू नका. शिवसेनेला कधी सुपाऱ्या घ्यायची गरज पडली नाही. सुपाऱ्या शिवसेना संपवण्यासाठी, फोडण्य़ासाठी घेतल्या गेल्या. अगदी इलेक्शन कमीशन, न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्राणांपर्यंत सुपाऱ्या घेऊन काम केलं जात असल्याचं म्हणत राऊतांनी घणाघात केला.

- Advertisement -

रिफायनरीला विरोध करण्यासाठी तेथील स्थानिक जर मरायला तयार असतील, तर शिवसेना त्यांना मरु देणार नाही. पहिली गोळी ही शिवसेनेच्या छातीवर असेल, असं म्हणत कोकणची जनता ठाकरेंच्या बाजूने असल्याचं राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -