घरमनोरंजनप्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर इलियानाची पहिली पोस्ट चर्चेत

प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर इलियानाची पहिली पोस्ट चर्चेत

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजने काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. इलियानाच्या या बातमीने सर्वचजण आश्चर्यचकित झाले. अनेकांनी तिला सोशल मीडियावर तुझं लग्न कधी झालं? तुझ्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण? असे अनेक प्रश्न देखील विचारले. दरम्यान, या सर्व नकारात्मक प्रश्नांकडे दुर्लक्ष करत इलियाना आपल्या प्रेग्नेंसीचा खूप आनंद घेत आहे. तिने नुकतीच इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, सध्या ती कशी आहे. तसेच तिने हे देखील सांगितलं की, कुटुंबामुळे तिला काय-काय करावं लागत आहे.

Ileana DCruz post

- Advertisement -

खरंतर, इलियानाने इंस्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यातील पहिल्या पोस्टमध्ये तिने एक मीम शेअर केला आहे, ज्यामध्ये मांजर दिसत आहे आणि तिचे पोट पूर्ण भरलेले आहे. त्यावर लिहिलंय की, जेव्हा तुम्ही चारपट जेवता आणि त्यानंतर कोणी तुम्हाला केक खायला सांगतं, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं. हा मीम शेअर करत इलियानाने लिहिलंय की, ‘कुटुंबासोबत डिनर करताना असं वाटतं.’ या पोस्टवरून हे स्पष्ट झालंय की सध्या इलियानाचे कुटुंब तिच्याकडे खूप लक्ष देत असून तिला भरपूर जेवायला देत आहे.

इलियाना DCruz केक

- Advertisement -

तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये इलियाने केकचा फोटो शेअर केला असून त्यावर तिने लिहिलंय की, “प्रेगी पर्क्स विशेषतः जेव्हा बहीण सुंदर ब्लॅक फॉरेस्ट केक बनवते.” असं इलियानाने लिहिलं आहे.

दरम्यान, 18 एप्रिल रोजी इलियानाने इंस्टाग्रामवरुन ती आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. त्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या तसेच अनेक नेटकऱ्यांनी तुझ्या बाळाचे बाबा कोण असे प्रश्न देखील विचारले होते.

 


हेही वाचा :

‘चौक’ 19 मे रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -