घरमहाराष्ट्रभारद्वाज, गोन्साल्वीस, फरेरांना होऊ शकते अटक

भारद्वाज, गोन्साल्वीस, फरेरांना होऊ शकते अटक

Subscribe

पुणे:- भीमा -कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत होते असलेल्या सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस, अरूण फरेरा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी पुणे सेशन कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे या तिघांना कधीही पुणे पोलीस अटक करू शकतात. कारण, शुक्रवारी या तिघांची नजरकैद संपली आहे. सध्या हे तिघेही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थानबद्ध आहेत. अटक टाळण्यासाठी या तिघांनी सात दिवसांची नजरकैद वाढविण्यासाठी पुणे सेशन कोर्टात अर्ज केला आहे.

पुण्याच्या सेशन कोर्टात भीमा-कोरेगाव एल्गार परिषदेप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या कथित माओवाद्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी पार पडली. या तिघांनाही २८ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुण्यात नेण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात या कारवाईला दिलेल्या आव्हानानंतर २६ ऑक्टोबरपर्यंत या तिघांसहीत आणखी दोन आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.

- Advertisement -

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. भारद्वाज, गोन्साल्विस आणि परेरा यांच्यासोबतच गौतम नवलखा आणि वरवरा राव यांनाही अटक झाली होती. इतर दोन आरोपी म्हणजेच गौतम नवलखा आणि वरवरा राव यांच्या जामिनावर पुण्यात निर्णय होणार नाही. कारण नवलखा यांच्यावर ठेवण्यात आलेली नजरकैद उठवण्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने १ ऑक्टोबर रोजी दिला होता. तर वरवरा राव यांनी पुणे पोलिसांच्या या कारवाईला हैदराबाद हायकोर्टात आव्हान दिले आहे. तिथे या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -